Ponda Municipality Meeting
Ponda Municipality MeetingDainik Gomantak

फोंडा पालिकेची बैठक ठरली वादळी!

आरोपांच्या फैरी : सव्वाचार वर्षांत पहिलीच बैठक गाजली अन् लांबली
Published on

फोंडा : बऱ्याच काळानंतर फोंडा पालिकेत हमरीतुमरी दिसली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांना काही नगरसेवकांनी फैलावर घेतल्याने आज (शुक्रवारी) झालेली बैठक वादळी ठरली. या पालिका मंडळातील सव्वाचार वर्षांच्या कार्यकाळातील हीच बैठक वादळी आणि सर्वाधिक वेळ घेणारी ठरली. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेली बैठक दुपारी 1.45 वाजता संपली.

बैठकीत गरमागरमी झाली तरीही आवश्‍यक ठराव घेण्यात आले आणि मुख्य म्हणजे नगरध्यक्ष रितेश नाईक यांनी बैठक उत्तम प्रकारे हाताळली. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली.

Ponda Municipality Meeting
लोबोंना पुन्हा ‘नगर नियोजन’चा दणका

नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यातील काही विषय वादळी ठरले. फोंडा पालिकेची मालकी असलेल्या जुन्या इमारतीत सोळा निवासी फ्लॅट आहे, मात्र ही इमारत धोकादायक झाल्याने त्या ठिकाण नवीन वास्तू बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र त्यापूर्वी येथे राहणाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करण्याचा विषय चर्चेला आला असता त्या सर्वांना इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.

फोंडा पालिका क्षेत्रातील व्यावसायिक करात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यासंबंधी फोंडा बिझनेस फोरमतर्फे व्यापाऱ्यांनी एक निवेदन देऊन हा वाढीव कर कमी करण्याची मागणी केली होती. यासंबंधीचा विषयही चर्चेला आला. बैठकीत या विषयावर चर्चा होऊन राज्यातील इतर पालिकांच्या व्यावसायिक कराशी तुलना करता फोंडा पालिकेचा व्यावसायिक कर कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यावर अधिक चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात येईल व निश्‍चितच कराच्या रकमेत कपात करण्यात येऊन व्यापाऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Ponda Municipality Meeting
गोव्यात आठवड्याभरात मॉन्सून दाखल

फोंडा पालिकेला ऑक्ट्रॉय कर मिळत नसल्याने निधीच्याबाबतीत मोठी अडचण भासते, त्याचा परिणाम विकासकामांवर तसेच पालिका कर्मचाऱ्यांच्या थेट पगारावर होत असल्याने पालिका प्रशासनाने एकरकमी मोठा निधी फोंडा पालिकेला उपलब्ध करावा यासंबंधी एक ठराव झाला. यासंबंधीची बोलणी नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी नगरविकासमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याकडे केली होती, त्याअनुषंगाने हा ठराव झाला. याशिवाय फोंड्यातील क्रांती मैदानाचा ताबा लष्कराकडे असल्याने त्यांचा पालिकेकडे असलेला करार संपुष्टात आला आहे, या कराराची मुदत वाढवण्यासंबंधी लष्कराकडून निवेदन आल्याने त्यावरही चर्चा झाली. करार संपला असला तरी लष्कराकडून येणे असलेला सहा लाखांचा कर अजून भरणा केला नसल्याने तो आधी भरण्यासंबंधीची सूचना संबंधितांना करून नंतरच या कराराची मुदत काही अटींवर वाढवण्याचे ठरले. फोंडा पालिकेच्या या बैठकीत अन्य काही विषयांवरही चर्चा करून आवश्‍यक निर्णय घेण्यात आले. पालिका मुख्याधिकारी योगिराज गोसावी व इतर पालिका अधिकाऱ्यांनी कामकाज हाताळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com