डिचोली शहर कचरा समस्येने हैराण, हॉटेल व्यावसायिकांवर संशय

परिसरात दुर्गंधी; पुरातत्व खात्याने संरक्षित केलेल्या जागेतही समस्या
Garbage Problem in Bicholim
Garbage Problem in BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ ही संकल्पना राबवत स्वच्छतेबाबतीत आघाडीवर असलेल्या डिचोली शहराची कचरा समस्या पाठ सोडायला तयार नाही. दारोदारी कचऱ्याची उचल आणि वेळोवेळी स्वच्छता करूनही शहरातील काही भागात कचऱ्याची समस्या पुन्हा-पुन्हा डोके वर काढत आहे. निमुजग्याकडे जाणाऱ्या पाजवाड्याच्या माथ्यावरील रस्त्यावर पुन्हा एकदा कचरा साचला आहे. (Garbage Problem in Bicholim)

पाजवाड्याच्या माथ्यावरील डिचोली-मये रस्त्याला जोडून शहरातील ऐतिहासिक ‘निमुजग्या’कडे (ईदगाह) जाणाऱ्या रस्त्यावर सध्या अस्वच्छतेचे दर्शन घडते. निमुजगा आणि या वास्तूकडे जाणारा रस्ता पुरातत्व खात्याने संरक्षित केला आहे. तरीही कचरा साचत असल्याने पालिकेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या या परिसरात प्लास्टिक तसेच सुका आणि ओला कचरा साचला आहे. हा कुजून सध्या परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. या कचऱ्याबरोबर नासलेले खाद्यपदार्थही टाकण्यात येत आहेत. या कचऱ्यावर ताव मारण्यासाठी गुरांचाही संचार सुरू आहे.

Garbage Problem in Bicholim
पंचायत निवडणुकांवर माविन गुदिन्होंनी दिली मोठी माहिती

हॉटेल व्यावसायिकांवर संशय!

‘निमुजग्या’कडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा कोठून येतो आणि कोण टाकतो, त्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कचऱ्यातील पदार्थ पाहता, हा कचरा हॉटेल वा गाडेवाल्यांकडून टाकण्यात येत असल्याचा अंदाज आहे. यापूर्वी अनेकदा या परिसरात टाकण्यात येणारा कचरा पालिका वा अन्य स्वयंसेवी संस्थांनी उचलून परिसर स्वच्छ केला आहे. मात्र, काही दिवस उलटले, की पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरू होतात. या प्रकारावर नियंत्रण येण्यासाठी पालिकेने कडक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्वच्छतेबाबतीत पालिका गंभीर आणि तत्पर असते. जागृती आणि आवाहन करूनही काही ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. ही शहराच्या सौंदर्याला निश्चितच बाधक आहे. कचरा टाकणाऱ्यांनी आपली मानसिकता बदलून मिळेल त्याठिकाणी कचरा टाकण्याचे बंद करून पालिकेला सहकार्य करावे. अस मत डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com