फोंडा येथील ट्रक पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

ट्रक पार्किंगमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ
Truck Parking
Truck ParkingDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी दोन दशकांपूर्वी बांधण्यात आलेला कुर्टी-फोंडा, ढवळी-फार्मगुडी या बायपास रस्त्यांवर दुतर्फा ट्रक पार्किंगमुळे हा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. या ट्रक पार्किंगमुळे जीव धोक्यात येत असल्याचे इथल्या स्थानिकांनी सांगीतले तसेच ट्रक टर्मिनसची मागणी केली. अलीकडेच तीन बायपास रस्त्यांचे चौपदरीकरणात रूपांतर झाले असले तरी, या रस्त्यावर जास्त वेळ उभे असलेले ट्रक हे अपघाताचे मुख्य कारण होत आहेत, असे येथील स्थानिकांनी सांगीतले. (Citizens suffer due to truck parking at Ponda)

Truck Parking
खाण भागातील विद्यार्थ्यांची परवड संपता-सपेना!

ते पुढे म्हणाले, कुर्टी-खांडेपार पंचायत येथे कोणताही उद्योग नसताना तेथे ट्रक उभे असतात. तसेच ढवळी-फार्मगुडी रस्त्यावर देखील ट्रक पार्किंग केलेले असतात. “ढवळी-फार्मगुडी ही तीव्र वळणांमुळे अधीच धोकादायक आणि अपघात (Accident) प्रवण असून तीव्र वळणांवर केलेल्या पार्किंगमुळे ती आणखी धोकादायक बनली आहेत. कवळे पंचायत ग्रामसभेत तसेच कुर्टी-खांडेपार पंचायतीमध्ये धोकादायक ट्रक पार्किंगचा (Truck Parking) मुद्दा अनेकदा गाजतो, परंतु अद्याप या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतेही उपाय किंवा ट्रक टर्मिनस बांधलेले नाही. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज येथील स्थानिकांनी बोलुन दाखवली.

सरकारने एकतर ट्रक टर्मिनस उपलब्ध करून द्यावे किंवा त्यांना कुंडई, मडकई (Marcaim) औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही.अशी मागणी स्थानिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com