Pissurlem:'अंबे मॅटालिक'ला विरोध; पिसुर्ले नागरिकांनी हरकती नोंदवल्याने विस्ताराच्या वाटा बंद?

प्रकल्प साकार होण्याबाबत साशंकता कायम
Pissurlem
PissurlemDainik Gomantak 
Published on
Updated on

पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीत गेल्या 20 वर्षांपासून 'अंबे मॅटालिक' कंपनी कार्यरत आहे. या कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाबाबत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने आज पिसुर्ले पंचायत सभागृहात जनसुनावणी पार पडली. यावेळी नागरिकांनी विस्तारासाठी हरकती नोंदवल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प साकार होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

(Citizens of Pissurlem have opposed the expansion of Ambe Metallic Company)

Pissurlem
Purple Fest 2023: गोव्यात प्रथमच दिव्यांगांसाठी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेचे आयोजन

अंबे मॅटालिक कंपनीने पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा विस्तार करून लोहखनिजावर आधारित वेगळ्या प्रकल्पाची उभारणी करण्यासंबंधी अहवाल पर्यावरण खात्याकडे सादर करत ना हरकत दाखल्याची मागणी करण्यात आली होती. याबाबतच्या विविध प्रक्रिया देखील पार पडल्या आहेत. मात्र नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती पाहता हा प्रकल्प साकारेल याची शक्यता कमी होत आहे.

Pissurlem
Goa: केरी-तेरेखोल फेरीधक्का नागरिकांसाठी ठरतोय धोकादायक!

नागरिकांनी विरोध करताना प्रदूषणासह अनेक मुद्दे पुढे करत या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यामुळे पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील या प्रकल्पाला विस्ताराच्या वाटा बंद झाल्याचे चित्र आहे. या विरोधामुळे पिसुर्ले औद्योगिक वसाहतीचा अनेक दिवसांपासुन प्रस्तावित असलेला प्रकल्पावर आता थांबवण्याखेरीज गत्यंतर नसल्याची स्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com