Festa do Povo Festival: फोन्तेन्हास पाहण्यासाठी वेळ ठरवा! ‘फेस्ता दो पोवो’ महोत्सवाविरोधातही पणजीवासीय एकवटले

Panaji Citizens Against the Festa do Povo festival: राजधानी पणजीतील फोन्तेन्हास आणि परिसरातील जुन्या वास्तू पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्यांच्या बेशिस्तीमुळे आम्हा स्थानिकांना त्रास होत आहे.
Panaji Citizens
Panaji CitizensDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीतील फोन्तेन्हास आणि परिसरातील जुन्या वास्तू पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्यांच्या बेशिस्तीमुळे आम्हा स्थानिकांना त्रास होत आहे, त्यामुळे येथील वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी विशिष्ट वेळ निश्‍चित करावी, अशी मागणी आम्ही महापौर रोहित मोन्सेरात यांना केली असल्याचे स्थानिक तुयान गोम्स परेरा यांनी सांगितले.

महापौरांना भेटल्यावर परेरा माध्यमांशी बोलत होते. यावेळी वास्को डायस, मॅक फोन्सेका, दोना ज्युलियाना डिसा व इतर नागरिक उपस्थित होते. तुयान परेरा म्हणाले की, फोन्तेन्हास परिसरात फेस्ता दो पोवो महोत्सव होणार आहे, त्याला आमचा विरोध आहे. हा महोत्सव होणार नसल्याचे तसेच आमच्या समस्यांवर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासन आम्हाला महापौरांनी दिले आहे.

प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवू!

फोन्तेन्हास परिसरात होऊ घातलेल्या फेस्ता दो पोवो महोत्सवाला स्थानिकांचा विरोध असल्याने तो होणार नाही. त्यासोबतच, पर्यटकांमुळे फोन्तेन्हास व त्या सभोवतालच्या परिसरातील नागरिकांना अनेक समस्या जाणवत आहेत.

त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सर्व खात्यांची एकत्रित बैठक येत्या काही दिवसांत बोलाविण्यात येणार आहे. हा विषय कायमस्वरूपी कशा स्वरूपात सोडवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

गोवा

Panaji Citizens
Salvador Do Mundo: डोंगरकापणीच्या प्रश्नावर निरुत्तर 'साल्वादोर'च्या महिला सरपंच गेल्या विरोधकांच्या अंगावर धावून Video

स्थानिकांच्या या आहेत मागण्या

१) फोन्तेन्हास व इतर परिसरातील वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगची वेगळी सुविधा करावी.

२) या परिसरात जे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत त्यांच्यावर चुकीची माहिती आहे त्यामुळे ते बदलावेत.

३) येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रसाधनगृहांची सोय नाही, त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत या परिसरात सुलभ शौचालये किंवा प्रशाधनगृहे उभारावीत.

४) येथे कशीही चालविण्यात येणारी वाहने तसेच फिरून विक्री करणाऱ्यांवर बंदी घालावी. शक्य असल्यास या ठिकाणांच्या पाहणीसाठी वॉर्डन नेमावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com