केरी-सत्तरीतील नागरिक अद्यापही गढूळ पाण्याने त्रस्त

15 दिवसांपासून पाणी गढूळ येत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे.
Keri-Sattari Muddy Water Problem
Keri-Sattari Muddy Water ProblemDainik Gomantak

Keri-Sattari Muddy Water Problem: गोव्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गहन बनला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा नियमित पुरवठा होत नसून, जिथे पुरवठा होतो तो अपुरा असल्याचे बोलले जात आहे. गोव्यातील केरी-सत्तरी (Keri-Sattari) भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणी गढूळ येत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे. सध्या या भागांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (Citizens in the keri-sattari still suffer from muddy water)

मुळातच पाणी पुरवठा कमी असतो, त्यात जे पाणी मिळते तेही शुद्ध नसून या खराब पाण्यामुळे केरी-सत्तरी भागातील ग्रामस्थ हैराण झाले आहे. भागातील आमदार आणि संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या व्यक्तींना तक्रार केल्यानंतरच पाणी मिळते, नाहीतर पाणी येतही नाही, असे मत एक ग्रामस्थाने व्यक्त केले. 15 दिवसांपासून येणारे हे गढूळ पाणी पिण्यायोग्य नसल्याने लोकांची पाण्यासाठी (Water Problem) वाताहत होत आहे.

एका नागरिकाने सांगितल्याप्रमाणे, 'या महिन्यात फक्त 4 तारखेला आणि नंतर वर्तमानपत्रात छापून आल्यामुळे 10 तारखेलाच मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा झाला होता. मात्र त्यानंतर अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे.

यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, 'पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जुनी झाली आहे. त्यामुळे त्यातून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. संबंधित पाईपलाईन बदलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून याचे काम लवकरच होणार आहे.'

तूर्तास तरी नागरिकांना पाणी सतत उकळून त्याचा गाळ काढूनच वापरावे लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com