होंडा परिसरातील नागरिक सार्वजनिक बांधकाम खात्यावर नाराज

अपघात वाढण्याची शक्यता
Citizens in Honda area angry over public Construction works department
Citizens in Honda area angry over public Construction works departmentDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले : पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा तिस्क परिसरात काही दिवसांपूर्वी बांधण्यात आलेल्या गटारावर काही ठिकाणी कॉक्रीट लाद्या न घातल्याने तेथे अपघात घडत आहेत, त्यामुळे याचा फटका व्यवसायिकांना बसत असून, याची दखल सार्वजनिक बांधकाम (Construction) खात्याच्या रस्ता विभागाने घेऊन उघड्या असलेल्या गटारावर त्वरित लाद्या घालव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या संबंधी सविस्तर वृत्त असे की, पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने होंडा तिस्क ते वडदेव मंदिर पर्यंतच्या होंडा ते वाळपई रस्त्याच्या एका बाजूला गटार व्यवस्था निर्माण केली आहे. परंतु सदर गटार व्यवस्था निर्माण केल्यानंतर त्या गटारावर आवरण घालण्यासाठी काही ठिकाणी कॉक्रीटच्या लाद्या न घातल्याने तेथे वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

Citizens in Honda area angry over public Construction works department
गोवा विमानतळावर गैरवर्तन केल्याचा फरहान आझमीचा आरोप

त्याच प्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या दुकानदारांना सुद्धा यांचा फटका बसत असून, कोणत्याही प्रकारचे वाहन उभे करण्यास अडचण निर्माण होत असल्याने त्यांना ग्राहक मिळत नाही असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

या संबंधी माहिती देताना येथील लक्ष्मी इस्टेट सभागृहांचे मालक गावस यांनी सांगितले की, उघड्या गटारामुळे काही दिवसांपूर्वी एक वाहन त्या गटारात कोलमडून अपघात (accident) झाला होता, त्याच प्रमाणे दुचाकी तसेच ये जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा याचा त्रास होत असल्याने, त्यापासून सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी उघड्या असलेल्या गटारावर कॉक्रीटच्या लाद्या घालणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com