"गोमंतकीयांनो आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे सेवन करून जीव धोक्यात घालू नका"

Citizens of Goa should not risk their life by taking ivermectin tablets
Citizens of Goa should not risk their life by taking ivermectin tablets
Published on: 
Updated on: 

सासष्टी:  आरोग्यमंत्र्यांनी आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे(Ivermectin Tablate) सेवनाबद्दल भारतीय वैद्यकीय संघटनेला (IMA) विश्वासात घेतलेले नाही हे आता उघड झाले आहे. कोविड आजारासाठी या  आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्यास मान्यता दिलेली नाही, असे आयएमएचे प्रवक्ते डॉ. संदीप नायक(IMA Dr.Sandeep Nayak) यांनी सांगितले. गोमंतकीयांचा वापर करून आरोग्यमंत्री विश्वजित राणे (HM vishavajit rane)आज आपली तिजोरी भरू पाहत आहेत, असा आरोप करीत गोमंतकीयांनी वैद्यकीय चाचणी न करता तसेच डॉक्टरांचा सल्ला न घेता आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे सेवन करून आपला जीव(Life) धोक्यात घालू नये, असा इशारा दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस(South Goa District Congress President Joseph Dias) यांनी केला.(Citizens of Goa should not risk their life by taking ivermectin tablets)

जागतिक आरोग्य संघटना, मेरिलॅंड विश्वविद्यालयाचे संसर्गिक रोग विभागाचे प्रमुख डॉ. फहिम युनूस तसेच विज्ञान व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जाणकारांनी या गोळ्यांचे सेवन योग्य आरोग्य चिकीत्सा न करता केल्यास अपायकारक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. गोवा सरकारला या गोळ्या लोकांना मोफत वाटण्याचा सल्ला सवाल डायस यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना केला. सुमारे 22 कोटी 50 लाखांचा गोळ्या खरेदीत घोटाळा असल्यानेच दोघेही गप्प आहेत, असा आरोप जोसेफ डायस यांनी केला आहे. तर, गोव्यातील स्वार्थी भाजप सरकारने आजाराचा बाजार मांडला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

भाजप सरकारने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी निविदा जारी केली होती का? ही ऑर्डर कुणाला व किती रकमेला देण्यात आली, ही माहिती देण्यासाठी सरकार टाळाटाळ करते, यावरुनच एकंदर प्रकरणांत घोटाळा असल्याचा आरोप डायस यांनी केला. आरोग्यमंत्री राणे यांनी सर्वप्रथम कोविड लसीकरण व चाचणी अधिक प्रभावी करण्यावर भर द्यावा. गोव्यात लसींचा आवश्यक साठा उपलब्ध असेल याची जबाबदारी त्यांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant supports Jit Arolkar in Mandrem
Goa Assembly elections 23 constituencies
Canacona Silent Protest
 Yuri Alemao Girish Chodankar