गोव्यातील नागरिकांनो सावधान! 'इव्हर्मेक्टिन' औषध न घेण्याचा WHO चा सल्ला

Citizens of Goa beware WHO advises not to take Evermectin
Citizens of Goa beware WHO advises not to take Evermectin
Published on: 
Updated on: 

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वैज्ञानिकांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी 'इव्हर्मेक्टिन' (Evermectin) या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट करत हे औषध न वापरण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी गोवा (Goa) राज्यात 18 वर्षावरील सर्व नागरिकांना हे औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सौम्या नाथन यांनी ही माहिती दिली आहे. (Citizens of Goa beware WHO advises not to take Evermectin)

कोरोनावरील नव्या लक्षणांसाठी कोणतेही औषध वापरण्याआधी त्याची क्षमता आणि सुरक्षितता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही चाचण्यांशिवाय कोविड19 च्या वापरासाठी इव्हर्मेक्टिन वापरण्यास परवानगी देत नाही, असं सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

डॉ. स्वामीनाथन यांनी जर्मनीच्या हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस कंपनी मर्कचे एक जुने विधान ट्विटरद्वारे शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी  ''वैज्ञनिक कोविड 19 च्या उपचारासाठी इव्हर्मेक्टिनच्या क्षमता तपासण्यासाठी अभ्यास करत आहे. आतापर्यंत हे कोरोनाच्या उपचारासाठी जास्त उपयोगी ठरेल असे कोणतेही प्रमाण मिळाले नाही,''  असं म्हटले आहे.

मागील दोन महिन्यांत दोनदा जागतिक आरोग्य संघटनेनं इव्हर्मेक्टिनचा वापर टाळण्याची सूचना केली आहे. याआगोदर मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनं इव्हर्मेक्टिनचा प्रभाव कमी असल्याचा दावा केला होता.

अन्न आणि औषध प्रशासनाने इव्हर्मेक्टिनला मान्यता दिली होती. हे औषध मलेरियासारख्या आजारांच्या उपचारांसाठी दिले जाणारे म्हणून वापरण्यात येते. बहुतेक वेळा आतड्यांसाठी स्टॉन्डोलायडासिस आणि ऑन्कोसरिसियासीस विकार असलेल्या रुग्णांसाठी  हे औषध दिले जाते. मात्र कोरोनावरील उपचारासाठी या औषधाला अधिकृत अशी मान्यता दिली नसली तरी जगातील अन्य विविध भागांमध्ये याचा वापर केल्याने रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरले आहे.

याआगोदर बांग्लादेशच्या एका वैद्यकीय पथकाने दोन औषधांच्य़ा मिश्रणाने इव्हर्मेक्टिन आणि डॉक्सीसाइक्लिन यांचा समावेश होता.
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Silent On Mhadei Dispute
Goa High Court Contempt Notice
Goa POCSO Accused Death
South Goa District Hospital Poor Facilities
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com