Christmas Shopping : मडगावात वाहतुकीचा बोजवारा; रस्ते जाम

Christmas Shopping : नाताळ, नव्या वर्षाच्या खरेदीसाठी झुंबड
Christmas Shopping
Christmas ShoppingDainik Gomantak

Christmas Shopping : सासष्टी, नाताळ तसेच नव्या वर्षाच्या खरेदीसाठी मडगावात झुंबड उडाल्याने येथील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडीमुळे बहुतेक रस्त्यांवरील वाहतूक रोडावली आहे.

खास करून नगरपालिका बागेच्या सभोवताली, पिंपळकट्टा, सडेकर चाळ, कपडे आळ व इतर भागांत वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहतुकीवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याचेही दिसून येत आहे.

टपाल कचेरीकडून बॅंक ऑफ इंडियाकडे जाण्यासाठी ३०० ते ४०० मीटरचा रस्ता कापण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. कोलवा सर्कलकडे सुद्धा वाहनांची रांग दिसून येत आहे.

चारचाकींसह दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी जागाच मिळत नसल्यामुळे नगरपालिकेला तीन चार वळसे घालावे लागतात. त्यातच भाड्याने देणारे दुचाकीवाले आपली वाहने नगरपालिकेच्या मागे पार्क करतात, तसेच पाववाले आपली वाहने पार्क करून पाव विक्री करीत असतात.

Christmas Shopping
Online Gambling In Goa: ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांच्या मते बहुतेक इमारत मालकांनी गाड्या पार्क करण्याचे रूपांतर दुकानांमध्ये केल्याने पार्किंगचा प्रश्‍न अधिक तीव्र झाला आहे. वाहतुकीचा खोळंबा होत असल्यामुळे न्यू मार्केटमधील विक्रेत्यांना गिऱ्हाईक मिळत नाही, असे ते म्हणाले.

डिक्सन वाझ म्हणाले की, मडगाव नगरपालिकेच्या परिसरात वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही. बाजारात येण्यासाठी लोकांना आपल्या गाड्या एक दोन किलोमीटर दूर ठेवून यावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करून ठेवण्यात येत असल्याने चालण्यासही जागा राहिलेली नाही.

अन्य वाहतूक पोलिसांची मदत

वाहतूक पोलिस अधिकारी संजय दळवी यांच्या म्हणण्यानुसार मडगाव शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न वरिष्ठांच्या लक्षात आणून देण्यात आला आहे. फोंडा व काणकोण येथील वाहतूक पोलिसांकडे मदतीचा हात मागितलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com