Chorla Ghat : रक्षक कठडे नादुरुस्त, गटारांची दुर्दशा, चोर्लाघाटातून प्रवास करणे ठरतेय धोकादायक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak
Published on
Updated on

संजय घुग्रेटकर

Chorla Ghat : चोर्लाघाटातून प्रवास करण्याऱ्यांची संख्या कमी नाही. प्रत्येक दिवशी हजारो लोकांची येजा असते. हा मार्ग कर्नाटक सीमेपर्यंत उत्तम असला तरी दोन्ही बाजूंची गटार व्यवस्था नादुरूस्त आहे. अनेक ठिकाणी गटारांचा उपसाच झालेला नाही. अनेक वळणावर लोखंडी संरक्षक कठडे मोडलेली आहेत. गेल्यावर्षी पडलेली झाडे अजूनही हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास जीव मुठीत घेतल्याशिवाय पर्याय नाही.

अंजुणे धरणापासून पुढे कर्नाटक सीमेपर्यंत अनेक ठिकाणी गटार व्यवस्थाच नाही. ज्या ठिकाणी गटार व्यवस्था आहे, तेथे गटारे भरलेली आहेत. जून महिना संपत आला, तरीसुद्दा मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आता पडणाऱ्या पावसात पाणी थेट रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसातच या पाण्याचा त्रास सहन करावा लागल्याचे काही प्रवाशांनी ‘गोमन्तक’ शी बोलताना सांगितले.

संरक्षक कठडे हवेत

घाटमार्गावर अनेक ठिकाणी अपघातप्रवण वळणे आहेत. या ठिकाणी लोखंडी संरक्षक कठड्याची गरज आहे. कारण अपघात झाल्यास वाहने किमान या कठड्यामुळे अडविली जातील. अन्यतः वाहने खोल दरीत कोसळतील. अशा घटना घडू नये यासाठी कठड्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही ठिकाणी हे कठडे नादुरूस्त आहेत. काही ठिकाणी ते गायबच झालेत. त्या ठिकाणी त्वरित संरक्षक कठड्याची व्यवस्था करावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

Chorla Ghat
Goa Electricity Department : वीज खात्याकडे कोट्यवधींची वीज बिलांची थकबाकी प्रलंबित..इतर सरकारी खात्यांचाही समावेश

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष गेल्या वर्षीची माती तशीच पडून

काही ठिकाणी गेल्या वर्षी दरडी कोसळल्या होत्या. त्यावेळी फक्त रस्त्यांवरील माती हटविण्यात आली, पण वर्षभरानंतरही गटारातील माती काढण्यात आलेली नाही. ही माती काढण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे? असा सवाल उपस्थित होतेाय. सार्वजनिक बांधकाम खाते – रस्ता विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून ही कामे त्वरित करणे गरजेचे आहे, असेही प्रवाशाने सांगितले.

Chorla Ghat
Goa Drug Case: चिंताजनक! दीड वर्षात ड्रग्जसंबंधी गुन्ह्यात वाढ; 6 महिन्यांत 89 जण अटकेत

वर्षभरात २०० अपघात

या मार्गावर वर्षभरात छोटे मोठे २०० अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अवजड वाहनांची सतत ये जा सुरु असते. अधिक क्षमतेने भरलेले ट्रक दरीत कोसळलेले आहेत. अनेकांना आपले जीव गमावावे लागले आहेत. त्यामुळे हा मार्ग अधिकाधिक सुसज्ज कसा होणार याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

फलक जुनेच झळकतात

चोर्ला घाट गोवा हद्दीवर यापूर्वीचा अवजड वाहनांना बंदी आदेशाचा फलक लावलेला आहे. त्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे काही वाहने थेट खाली येतात. केरी चेकपोस्टवर विचारल्यावर त्या फलकाबाबत सांगतात आणि निघून जातात किंवा दंड भरुन निसटतात. पण या काळात इतर वाहन चालकांना होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी तपासणी नाक्यावरील पोलिसांनी घाटामार्गावर गस्त घालण्याची गरज आहे.

Chorla Ghat
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

सीमेवर हवा पोलिस बंदोबस्त

चोर्ला घाटात दिवसा अवजड वाहनांवर बंदी आहे, असे असताना दिवस अवजड वाहने प्रवास करतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. दो दिवसांपूर्वी, एक इंजिनसह चेस घेऊन भरधाव येताना एका चारचाकीला ठोकरल्याची घटना घडली होती. सुदैवाने, यात सर्वजण बचावले. पण मूळात या गाडीची चेस घेऊन येणाऱ्यांना दिवसा परवानगी देता कामा नये. तसेच अनेक अवजड वाहने दिवसात घाटमार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबवली जातात. त्यामुळे इतरांना वाहने हाकणे कठीण होते. गोवा हद्दीत वाहने येताच कामा नये, यासाठी सीमेवर पोलिस बंदोबस्त करायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com