PM Modi म्हणतात... परदेश विसरा भारतातच करा लग्न; काश्मीर, गोवा, केरळ आहेत उत्तम पर्याय

परदेशात लग्न करणं हा एक वेगळाच अनुभव असेल असं काही लोकांना वाटतं. तर, काही लोकांसाठी तो स्टेटसचाही विषय असतो.
Goa Wedding Venues
Goa Wedding VenuesDainik Gomantak
Published on
Updated on

Destination Weddings: केवळ श्रीमंतच नव्हे तर मध्यमवर्गीयही आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशात जाऊ लागले आहेत. नुकतेच मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत चिंता व्यक्त करत भारतीय लोकांनी परदेशात न जाता देशातच लग्न केले तर देशाचा पैसा देशातच राहील आणि अर्थव्यवस्थाही मजबूत होईल, असे सांगितले.

परदेशात लग्न करणं हा एक वेगळाच अनुभव असेल असं काही लोकांना वाटतं. तर, काही लोकांसाठी तो स्टेटसचाही विषय असतो. पण, भारतात देखील खूप सुंदर ठिकाणे आहेत जिथे परदेशात जाऊन लग्न केल्यासारखाच अनुभव मिळू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

लग्नाच्या दृष्टीने युरोप हे श्रीमंत लोकांसाठी आवडते ठिकाण मानले जाते. दीपिका आणि अनुष्कासारख्या सेलिब्रिटी यांच्यासह इतर अनेक श्रीमंत लोकांनाही तिथे जाऊन लग्न करायला आवडते.

येथील सौंदर्य आणि थंड हवामान हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. युरोपातही स्पेन, इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जॉर्जिया आणि तुर्की ही भारतीयांची लग्नासाठी आवडती ठिकाणे आहेत.

वेडिंग प्लॅनर्सच्या मते थायलंड हा समुद्रकिनाऱ्यावरील विवाहांसाठी लोकांचा सर्वात आवडता पर्याय म्हणून उदयास आला आहे. याशिवाय बीच वेडिंगसाठी लोक मालदीव, श्रीलंका आणि व्हिएतनामला जाण्यास प्राधान्य देत आहेत.

भारतात लग्नासाठी गोवा आणि केरळ या बाबतीत खूप चांगले आहेत आणि ज्यांना बीच वेडिंग करायचे आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. 'बीच वेडिंगसाठी भारतातील गोवा आणि केरळमधील कोची शहर इतके लोकप्रिय आहे की परदेशातून लोक येथे लग्न करण्यासाठी येतात. याशिवाय अंदमान निकोबारही हळूहळू समुद्रकिनारी विवाहसोहळ्यांचे नवीन केंद्र बनत आहे. तसेच पाँडिचेरीमध्ये समुद्रकिनारी विवाहसोहळा आयोजित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com