Goa Student: गुण पारखून करियर निवडा; शिक्षण संचालक भूषण सावईकर

Goa Student: पणजीत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
Students in Goa
Students in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Student: केवळ एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता करियरसाठी अनेक पर्याय समोर ठेवा. परंतु हे पर्याय समोर ठेवताना विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखले पाहिजे, जेणेकरून आपण कोणकोणत्या क्षेत्रांत अधिक उठावदार कामगिरी करू शकतो याचे ज्ञान त्‍यांना होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गुणांची पारख करूनच करियर निवडावे, असे आवाहन उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी केले.

Students in Goa
Goa Government: एसटी समाजाचा 5 मार्चला विधानसभेवर मोर्चा : फर्नांडिस

उच्च शिक्षण संचालनालय पर्वरी, गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद, गोवा संगीत महाविद्यालय आल्तिनो-पणजी आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कन्वर्ज : २०२४’ अंतर्गत इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुणे या नात्याने सावईकर बोलत होते.

यावेळी कला व संस्कृती संचालनालयाचे माजी उपसंचालक अशोक परब, गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक मक्तेदार आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती.

सुरवातीला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. गोवा संगीत महाविद्यालयाचे विद्यार्थी सोहम हिर्लेकर, अलिशा सिमेपुरुषकर व साईश्वरी नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

Students in Goa
Goa Lifestyle: शाश्‍वताच्या मेरूशिखरी

कार्यशाळेतील ठळक बाबी

  • अशोक परब यांनी संगीत क्षेत्रातील मुलांसाठी सरकारी व निमसरकारी पातळीवर उपलब्ध असलेल्या अनेक संधींबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात प्रकाश देसाई यांनी संवादकाचे काम पाहिले.

  • डॉ. प्रवीण गावकर यांनी स्वाट परीक्षण (swot analysis)  याअंतर्गत स्वत:चे परीक्षण करणे, एखादा कलाकार बनण्यासाठी नियमित रियाज, स्वास्थ्यासाठी व्यायाम, मनाचा निग्रह याबाबत सूचित केले. मयंक बेडेकर यांनी संवादक म्हणून काम सांभाळले.

  • राजेंद्र तालक यांनी चित्रपट क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींबाबत माहिती दिली. रेकॉर्डिंग स्टुडिओबाबतही चर्चा केली.

  • रूपेश गावस यांनी संगीत क्षेत्रातील संधी कशा पद्धतीने शोधाव्यात, याबद्दल मार्गदर्शन केले.  

  • डॉ. साईश देशपांडे यांनी संगीत शिकणारे विद्यार्थी/विद्यार्थिनी नाट्यक्षेत्रात संगीतकार म्हणून कसे कार्य करू शकतात, यावर प्रकाश टाकला.

  • श्रुती कळंगुटकर यांनी संवादक म्हणून जबाबदारी सांभाळली.

आपल्या क्षेत्रात जो मार्ग स्वतःला सुव्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ शकतो, त्या मार्गाचा अवलंब करावा. यश त्या मार्गातूनच मिळते. संकटांना सामोरे जाण्‍यासाठी तत्‍पर रहा.

- डॉ. विठ्ठल तिळवी, (सदस्‍य, गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद)

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने गोवा सरकार विविध उपक्रम राबवत आहे. त्‍यास चांगला प्रतिसादही मिळत आहे. आजची कार्यशाळा हा त्याचाच भाग आहे.

- डॉ. शशांक मक्तेदार, प्राचार्य, संगीत महाविद्यालय, पणजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com