

डिचोली: बेलाभाट-चोडण येथे पाण्याची टाकी स्वच्छ करताना चवताळलेल्या मधमाशांनी हल्ला केल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुटका केली. बचावकार्यादरम्यान दोन जवानही किरकोळ जखमी झाले.
कमल ओली (२७, हरयाणा) आणि संजित लोहरा (३०, झारखंड) हे कामगार एका व्हिलाच्या उंचावरील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेले होते. अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने दोघेही टाकीजवळ अडकले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर ११२ क्रमांकावरून डिचोली अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.
अधिकारी शिवाजी नाईक आणि उपअधिकारी व्ही. डी. गावकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आपला जीव धोक्यात घालून जवानांनी जखमी कामगारांची सुटका केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.