Chinese FM Qin Gang lauds Maharashtra Goa origin doctor Kotnis
Chinese FM Qin Gang lauds Maharashtra Goa origin doctor KotnisPIB

SCO Summit: सोलापूरात जन्म, गोव्यात वास्तव्य; डॉ. कोटणीस यांचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले तोंडभरून कौतुक

बैठकीच्या पहिल्या दिवशी चीन, रशिया, पाकिस्तान तसेच, भारत यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चा झाल्या.
Published on

SCO Summit Goa 2023: गोव्यात सुरू असलेल्या दोन दिवसीय शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी चीन, पाकिस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री सध्या राज्यात आहेत. बैठकीच्या पहिल्या दिवशी चीन, रशिया, पाकिस्तान तसेच, भारत यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चा झाल्या.

दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग (china FM Qin Gang in sco) यांनी गोव्यातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी 1938 साली झालेल्या सीनो-जपान युद्धात महत्वाची भूमिका बजावली होती. कोटणीस यांनी चिनी सैनाला वैद्यकीय मदत देत कर्तव्य बजावले होते. कोटणीस यांनी केलेले कार्य भारत आणि चीन यांच्यातील मैत्रीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचा दाखला चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांनी गोव्यात sco बैठकीदरम्यान दिला.

'आपण कोटणीस यांच्याप्रमाणे दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबध आणि शांततेचा संदेश पुढे घेऊन जायला हवे. 140 कोटी भारतीय आणि 140 कोटी चिनी यांच्यातील संवाद आणि मैत्री वाढवण्यावर भर देऊया.' असे चीनच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Chinese FM Qin Gang lauds Maharashtra Goa origin doctor Kotnis
SCO Summit Goa 2023: हस्तांदोलन अन् डिनर; बिलावल आणि जयशंकर यांची भेट, द्विपक्षीय बैठकीची शक्यता कमी

डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला होता तर, त्यांचे वास्तव्य गोव्यातील पेडणे येथे होते. 1938 साली झालेल्या दुसऱ्या सीनो-जपान युद्धात भारतातून वैद्यकीय पथक चीनमध्ये पाठवण्यात आले होते. पाच जणांच्या पथकात डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचे देखील समावेश होता.

चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग आणि मंत्री सुन वेलडाँग यांनी गुरूवारी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्याशी संबधित लोकांची भेट घेतली. यामध्ये कोटणीस मेमोरिअल कमिटीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जाधव यांच्यासह इतर लोकांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com