Chimbel: महिलांच्या एकजुटीसमोर चिंबल पंचायत नरमली! ग्रामसभा न घेतल्याने संताप; निदर्शनांनंतर तारीख जाहीर

Chimbel Gramsabha: चिंबल येथील ग्रामस्थांनी पंचायतीसमोर निदर्शने करून दीर्घकाळ प्रलंबित असलेली ग्रामसभा बोलावण्यास पंचायत मंडळास भाग पाडले.
Chimbel villagers protest
Chimbel villagers protestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : चिंबल येथील ग्रामस्थांनी पंचायतीसमोर निदर्शने करून दीर्घकाळ प्रलंबित असलेली ग्रामसभा बोलावण्यास पंचायत मंडळास भाग पाडले. मागील दहा महिन्यांहून अधिक काळ ग्रामसभा आयोजित न केल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखेर सरपंच संदेश शिरोडकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून १५ मार्च ही तारीख निश्‍चित केली.

सरकारी खात्यांकडून वारंवार आदेश देऊनही ग्रामसभा न घेतल्याचा आरोप करत आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता महिलांनी शांततापूर्ण मोर्चा काढला व पंचायत कार्यालय काही काळ उघडू दिले नाही. वाढता तणाव लक्षात घेऊन सरपंच पोलिसांच्या उपस्थितीत कार्यालयात आले.

Chimbel villagers protest
Chimbel: चिंबल ग्रामस्थांची महत्वपूर्ण मिटिंग! गाव, तळ्यासाठी सदैव लढणार; सभेत घेतले 2 ठराव

यावेळी रेघना कुंकळकर व स्मिता शिरोडकर यांनी अनिवार्य ग्रामसभा न घेतल्‍याबद्दल सरपंचांना जाब विचारला. सुमारे दीड तास कार्यालय बंद राहिले. महेश कुंकळकर यांनी महिलांच्या एकजुटीमुळे ग्रामसभा निश्‍चित झाल्याचे सांगितले.दरम्‍यान, आगामी ग्रामसभेत प्रस्तावित मेगा प्रकल्प, तोय्यार तलाव, वाढता कचरा आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

Chimbel villagers protest
Chimbel: चमत्कार घडला, हे खरे! 'चिंबल'च्या कायदेशीर लढ्यातून मिळालेला धडा..

पिळर्ण येथील ग्रामस्‍थ पाण्‍यासाठी रस्‍त्‍यावर

पिळर्ण-बार्देश येथील प्रभाग ३ मध्ये गेल्या आठ महिन्यांपासून पाण्‍याची समस्‍या जाणवत आहे. अखेर आज ग्रामस्‍थांना रस्‍त्‍यावर उतरून पाणीपुरवठा सुरळीत करण्‍याची मागणी केली. पर्वरी महामार्गाच्या कामावेळी वरील प्रभागाला जोडणाऱ्या ओ-कोकेरो जंक्शनवरील जलवाहिनीला धक्का लागल्याने पाण्याच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com