Chimbel Toyaar Lake
Chimbel Toyaar Lake Dainik Gomantak

Chimbel: चिंबलवासीय पुन्हा नाराज! तोयार तलाव सर्वेक्षणावर आक्षेप; NIO चे जलशास्त्रज्ञ महत्वाच्या बैठकीस अनुपस्थित

Toyaar Lake Survey: बैठकीस काही ग्रामस्थ, वकील तसेच जलस्रोत व इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, एनआयओचे जलशास्त्रज्ञ बैठकीस अनुपस्थित होते.
Published on

पणजी: तोयार तलावाच्या सर्वेक्षणात पाणलोट क्षेत्राचे दोन भाग करण्यात आल्याबाबत, तसेच नैसर्गिक ओहोळाचा प्रवाह लोकांनी वळविल्याची नोंद केल्याबाबत चिंबल ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) यांचे जलशास्त्रज्ञ महत्त्वाच्या बैठकीस अनुपस्थित राहिल्यानेही ग्रामस्थ नाराज झाले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) सल्लागार प्रमोद बदामी यांच्याबरोबर चिंबल ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची शनिवारी पर्यटन भवनात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बैठक झाली.

या बैठकीबाबत माहिती चिंबल जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी उपोषणस्थळी दिली. बैठकीस काही ग्रामस्थ, वकील तसेच जलस्रोत व इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, एनआयओचे जलशास्त्रज्ञ बैठकीस अनुपस्थित होते. त्‍याबद्दल नाराजी व्‍यक्त करण्‍यात आली.

Chimbel Toyaar Lake
Chimbel: 'चिंबल'चा लढा हा गोव्यातीलच नव्हे तर भारतातील प्रशासकीय यंत्रणेसाठी एक वस्तुपाठ आहे..

NIO शास्त्रज्ञ बैठकीस अनुपस्थित

एकीकडे एनआयओकडून पुन्हा सर्वेक्षण करून नवीन अहवाल तयार केला जाईल, असे सरकार सांगत असताना, त्याच संस्थेचे जलशास्त्रज्ञ आजच्या महत्त्वाच्या बैठकीस अनुपस्थित राहणे गंभीर असल्याचे शिरोडकर यांनी नमूद केले. बैठकीत कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chimbel Toyaar Lake
Chimbel Protest: चिंबलमधले प्रकल्प रद्द वा स्थलांतरित करा! ग्रामस्थांची सरकारला 7 दिवसांची मुदत; आंदोलन तीव्र होण्याची शक्यता

प्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासाठी पंचायतीला देण्यात आलेले एक कोटी रुपयांचे शुल्क अजूनही संबंधित खात्याने परत का घेतले नाही, तसेच प्रकल्प हटविण्याची घोषणा असूनही संरक्षणासाठी उभारलेली पत्रे का हटविण्यात आलेली नाहीत, असे सवाल अजय खोलकर यांनी उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com