Summer Camp : गोमन्तक समर कॅम्पला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Summer Camp : लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांना व्यासपीठ मिळवून द्यावे या उद्देशाने या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
Gomantak Summer Camp
Gomantak Summer Camp Dainik Gomantak
Published on
Updated on

Summer Camp :

पणजी, दै. गोमन्तकतर्फे बालभवन केंद्र, पणजीच्या सहकार्याने आयोजित गोमन्तक समर कॅम्प २०२४ उपक्रमाला चिमुकल्या बाळगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात २५० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांना व्यासपीठ मिळवून द्यावे या उद्देशाने या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या समर कॅम्पमध्ये अशोक तिळवे यांनी मुलांना बोधपर गोष्टी सांगितल्या, मुलांकडून प्राथर्ना म्हणून घेतली. योग प्रशिक्षक अक्षता हळर्णकर यांनी विविध योग प्रकारांचे प्रात्याक्षिक दाखविले तसेच मुलांकडूनही योग, प्राणायाम करवून घेतले.

क्राफ्ट प्रशिक्षक कविता गौडा विविध कलाकृती विद्यार्थ्यांना करून दाखविल्या. त्यांनी कागदापासून गुलाब बनविण्याची प्रक्रिया मुलांना अधिक भावली. नृत्य प्रशिक्षक चैत्रा नावेलकर यांनी मुलांना नृत्याचे विविध प्रकार करवून घेतले. मोजमस्तीत मुलांनी या सर्व उपक्रमात सहभाग घेतला.

समर कॅम्प कार्यक्रमाच्या उद्‍घाटनसमयी गोमन्तकचे सरव्यवस्थापक विजू पिल्लई, बालभवनचे संचालक शशिकांत पुनाजी, सहाय्यक वितरण व्यवस्थापक भारत पोवार, साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष अशोक तिळवे आदी मान्यवर उपस्थित होते. समर कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालभवनचे शिक्षक महेश गावस यांनी केले.

नृत्याचा लुटला आनंद

समर कॅम्पमधील सर्वच उपक्रमांना मुलांचा चांगला प्रतिसाद लाभला. नृत्याच्या कार्यशाळेत सर्वं विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सामूहिक नृत्य केले. विविध बोधपर गाण्यांवर चिमुकल्यांनी ठेका धरला. नृत्यादरम्यानचे बालचमूंच्या मुखावरील हावभाव पाहण्यासारखे होते. गोमन्तक समर कॅम्पमध्ये मौजमस्ती, धमाल करत अनेक नवीन गोष्टी शिकता व शिकवता आल्याचे समाधान मुलांमध्ये दिसून आले.

Gomantak Summer Camp
Goa Politicians And Politics: कटाप्पा, सरडा, लापीट, घाबरट! गोव्याच्या राजकारणात उपमांची सरबत्ती

‘गोमन्तक’ जनतेचा आवाज : पुनाजी ः

शशिकांत पुनाजी म्हणाले की, दै. गोमन्तक मागील ६३ वर्षांपासून कार्यरत आहे. गोमन्तक केवळ वर्तमानपत्र नसून गोमंतकीय जनतेचा आवाज म्हणून कार्यरत आहे. आमच्या लहानपणी ज्यावेळी उन्हाळी सुट्टी पडायची त्यावेळी आम्हाला मामाच्या घरी जायचे वेध लागायचे परंतु सद्यःस्थितीत मामा, मामी तसेच आजोबा देखील कामाला जात असल्याने आजच्या काळात बालभवन मुलांचे मामाचे घर ठरत आहे.

बालभवन राज्यातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदैव कार्यरत राहील. गोमन्तकने भविष्यातही अशा प्रकारचे समर कॅम्प राबवावे आम्ही सदोदित तत्पर असू असे शशिकांत पुनाजी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com