Chikungunya: गोव्यात मोतीडोंगर ठरला 'हॉटस्पॉट' चिकुनगुनियाच्या रुग्‍णांमध्ये तब्बल 9 पट वाढ

Chikungunya: गोवा राज्यात गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा चिकुनगुनिया रुग्णांच्या संख्येत तब्‍बल नऊपट वाढ झाली आहे.
Chikungunya
ChikungunyaDainik Gomantak
Published on
Updated on

Chikungunya: गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा राज्यात चिकुनगुनिया रुग्णांच्या संख्येत तब्‍बल नऊपट वाढ झाली आहे. या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्‍यांच्‍या काळात केवळ 10 रुग्ण आढळले होते. परंतु यंदा त्‍याच कालावधीत 106 रुग्‍ण आढळले आहेत. संसर्गाचा स्रोत झोपडपट्टीत आढळला असून मडगाव येथील मोतीडोंगर हॉटस्पॉट ठरला आहे, अशी माहिती आरोग्य संचालनालयाने दै. ‘गोमन्तक’ला दिली.

2021 मध्ये राज्‍यात चिकुनगुनिया बऱ्यापैकी नियंत्रणात होता. परंतु यंदा परिस्थिती बदलली असून मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत. मडगाव येथील मोतीडोंगरावर ही संख्‍या खूप मोठी आहे. शेजारच्या राज्यांतून हा संसर्ग वाढत आहे. याचा स्रोत आम्ही शोधून काढून योग्य खबरदारी घेतली आहे.

त्यामुळे किमान आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, असे राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.शेजारच्या राज्यांतून येणाऱ्यांकडून हा आजार आणखी पसरला. उपाययोजना आखण्‍यात आल्‍या आहेत, असे त्‍यांनी सांगितले.

डॉ. कल्पना महात्मे, राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या गोवा मुख्याधिकारी-

मडगावातील मोतीडोंगरावर चिकुनगुनियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला. मात्र सामान्य ताप आणि सर्दी असल्याचे गृहित धरून कोणी चाचणी केली नाही. जेव्हा पहिल्या रुग्णाची पुष्टी झाली, तेव्हा संसर्गाचे प्रमाण वाढले होते. त्‍यानंतर योग्य उपचार आणि सावधगिरीची पावले उचलल्‍यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आम्हाला यश मिळाले. नोव्हेंबरमध्ये तर चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com