Panaji : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पणजी दूरदर्शनवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा होणारा ''हॅलो गोयंकार'' फोन-इन कार्यक्रम लोकप्रिय बनत आहे. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जनतेने विचारलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तर देत राज्यकारभाराची दिशा स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी आणि जुगार- मटका खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत विविध कल्याणकारी योजना येत्या महिन्याभरात मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.
दूरदर्शनवरील या एक तासाच्या कार्यक्रमात राज्यभरातून 35 नागरिकांनी विविध विषयांचे प्रश्न विचारले. यात कल्याणकारी योजना, रस्त्यात वाढणारी गुन्हेगारी, मटका जुगार, स्मशानभूमीचे प्रश्न, भंगार अड्डे , बेरोजगारी, अशा विविध समस्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गृह आधारचे 30 हजार व दयानंद सामाजिक सुरक्षा योजना चे 8 ते 10 हजार अर्ज लवकरच निकालात करण्यात येतील. काही अर्ज अपुरे आणि आवश्यक दस्तऐवज न जोडलेले आहेत. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे अर्ज निकालात काढण्यात येतील, असे ते म्हणाले.
दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मटका, जुगार किंवा कोणत्याही गुन्हेगारी बाबींना थारा दिला जाणार नाही. यासाठी पोलिसांना आवश्यक असलेल्या सूचना देण्यात आल्या असून प्रामुख्याने झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आमच्या सरकारचे प्राधान्य असेल. नागरिकांना मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक उपजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार पेटी ठेवली जाईल लोकांनी आपल्या तक्रारी समस्या लिहून या पेटीत टाकाव्यात या तक्रारींची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमातील ठळक आश्वासने
सरकारी खात्यातील जुनी वाहने दोन महिन्यात स्क्रॅप केली जातील.
सामाजिक योजना येत्या महिन्यात मार्गी लावणार.
जुगार व मटक्यासारख्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
गोमेकॉमध्ये पदवीधर अभ्यासक्रमासाठी आरक्षणाची अधिसूचना काढण्यात येईल.
सुधारित किमान वेतन १५ दिवसात जाहीर केले जाईल.
गोमेकॉमध्ये नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने सुरू केले जाईल.
सरकारी खात्यासाठी घेतलेल्या वाहनांचे पैसे महिन्याभरात दिले जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.