

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झालेली नाही त्यांनी आज साखळी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. पणजीचे आमदार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांना विधानसभा अधिवेशन काळात कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व मंत्री, आमदार आणि विधानसभेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे विधिमंडळ सचिवांनी सुचवले होते.
मुख्यमंत्र्यांनी आज साखळी येथील आरोग्य केंद्रात आपली तपासणी करून घेतली त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने आज सायंकाळी ही माहिती दिली. (Chief Minister Pramod Sawants corona report came)
यापूर्वी मुख्यमंत्र्यांना एक वेळा कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांनी गृह अलगीकरणात स्वतःवर उपचार करून घेतले होते. दरम्यान कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीही आपली कोरोनाची चाचणी करून घेतली आहे आणि त्यांनाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.