मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मुलाखत नुकतीच एका प्रसिद्ध माध्यमाने घेतली आहे. या मुलाखती दरम्यान त्यांनी गोव्यासह देशभरातील पर्यटन क्षेत्राच्या अनुशंगाने चर्चा केली. यावेळी ते म्हणाे की, जर गोव्यात रशिया, ब्रिटनवरुन थेट चार्टर येत असतील तर अशा प्रकारे देशभरात पर्यटनासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असे ही ते म्हणाले.
(Chief Minister Pramod Sawant views on women safety and tourism)
महिला सुरक्षेचा प्रश्न देशात वाढतो आहे, तर गोव्यात याबाबत काय उपाय योजना केल्या जात आहेत ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यात पिंक फोर्स 24 तास उपल्बध आहे. याबरोबरच सुरक्षा कॉल सेंटर कायम सुरु आहेत. ते केवळ महिलांसाठी असल्याचे ते म्हणाले.
महिलांचा पर्यटनातील सहभाग वाढवण्यासाठी महिला सुरक्षा आवश्यक आहे. सुरक्षा वाढल्यास येत्या काळात फक्त महिला पर्यटनाचे आयोजन करु शकतील या शक्यतेबाबत त्यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी महिलांसाठी पिंक फोर्स, पिंक रिक्षा हे पर्याय उपलब्ध करण्यात आले असल्याचं ते म्हणाले. महिला सुरक्षेवरुन ते वारंवार या मुद्यांचा उल्लेख करत होते.
बँकोक सारख्या छोटा देशाला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात मात्र, भारतात ही स्थिती नाही यावर विचारले असता ते म्हणाले की, गेल्या साठ वर्षात पर्यटन क्षेत्रावर गांभिर्याने विचार केला गेला नाही. भारतात सर्व प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. मात्र पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची स्थिती असल्याचे ते म्हणाले.
पायाभूत सुविधांचा निर्माण केल्या तरच पर्यटक भारताकडे वळतील असे ते म्हणाले. गोवा राज्य प्रशासन यावर गांभिर्याने काम करत आहे. मात्र इतर राज्य सरकारे याकडे कोणत्या प्रकारे पाहतात हे महत्त्वाचे असल्याचं ते म्हणाले.
पर्यटनासाठी संपुर्ण देश म्हणून एक चार करणे आवश्यक...
पर्यटनाचा विचार करताना संपुर्ण देश म्हणून आपण एकच म्हणून विचार करणे आवश्यक आहे. मात्र आपल्याक़डे याचा अभाव आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. याचा फायदा संपुर्ण देशाला होऊ शकतो असे ही ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की जर गोव्यात रशिया, ब्रिटन यांसारख्या देशातून गोव्यात चार्टर येऊ शकतात तर संपुर्ण देशात हा पर्याय तयार होऊ शकतो. असे म्हटले आहे.
देशातील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत काही खास पर्याय आहेत का? तसेच गोव्यात याबाबत काही उपाय करता येईल का? असे विचारले तर ते म्हणाले की, होय देशभरात आजही पर्यटकांच्या सुरक्षेवरुन खास सुरक्षा घेतली जाणे आवश्यक आहे. ज्याच्यात फक्त पर्यटकांसाठी सुरक्षा पुरवली जाण्याची व्यवस्था असेल असे ते म्हणाले. याबाबत गोवा राज्य गांभिर्याने विचार करत असल्याचं ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.