CM Pramod Sawant
CM Pramod SawantGomantak Digital Team

Goa Budget Session 2023 : परप्रांतीय कामगारांची पार्श्वभूमी तपासा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : व्यावसायिकांना निर्देश; मांद्रेतील हल्ल्याची गंभीर दखल
Published on

पणजी : राज्यातील औद्योगिक कंपन्या, व्यावसायिक, आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची राज्य कामगार खात्याकडे नोंदणी करावी. त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. तसेच यापुढे या सर्वच कामगारांकरिता गोवा कामगार कार्ड बंधनकारक राहिल, अशी घोषणा त्यांनी आज विधानसभेत केली. शुक्रवारी मांद्रे येथे डच युवतीवर झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मांद्रे येथील घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संशयिताला गजाआड केले आहे. अभिषेक वर्मा डेहराडूनचा रहिवासी असून या हॉटेलकडून त्याची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली गेली नव्हती. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता असते.

प्रामुख्याने सेवा देणाऱ्या हॉटेल व्यवसायात हे बाहेरील कामगार सेवेत आहेत. यासाठी हॉटेल मालकांनी त्यांच्या कामगारांची पडताळणी करणे आवश्यक आहे.

कामगारांची तपासणी सुरू

कामगार कार्ड दिल्यास कामगारांचा मूळ पत्ता खात्याकडे आणि संबंधित हॉटेल व्यवसायिकांकडे मिळू शकतो. हॉटेल व्यवसायिकांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्या कामगारांना कामावर ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे. गोवा पोलिस खात्याकडूनही याबाबत सतर्कता पाळली जात आहे. उद्योग आणि हॉटेल व्यवसायातील कामगारांची तपासणी केली जात आहे.

CM Pramod Sawant
Goa Budget 2023 : शेतजमीन हस्तांतरण निर्बंध विधेयक गदारोळात संमत

युरिको डायस यांना पुरस्कार जाहीर

डच महिलेला हल्ल्यातून वाचविणाऱ्या युरिको डायस यांनी आपल्या जीवाची बाजी लावून शौर्य दाखवले. या पर्यटक महिलेला वाचवण्याचा धाडसी प्रयत्न केला. त्याची प्रकृती सध्या ठीक आहे. डायस यांनी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांना येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com