Goa: डेल्टा व्हेरीयंट च्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमा सील

बॉर्डरवर कोरोना चाचणी सुरू , मुख्यमंत्र्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
Goa: डेल्टा व्हेरीयंट च्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमा सील
Published on
Updated on

महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण मिळाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून अशी लागण झालेले रुग्ण गोव्यात येऊ नये म्हणून गोव्यातील सीमा मार्गावर कडक तपासणी सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केरी सत्तरी येथील चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी व तपासणीचा आढावा घेतला. (Chief Minister Sawant visited Sattari Check Naka)

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की डेल्टा प्लसची प्रकरणे शेजारील राज्यात वाढत चालल्याने त्याचा प्रसार गोव्यात होऊ नये म्हणून गोवा सरकारने आपल्या सर्व चेक नाक्यावर कडक तपासणी सुरू केली असून गोव्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कोविड नकारात्मक असेल याकडे सरकार सतर्क आहे . त्यासाठी सर्व चेक नाक्यावर कोविड तपासणी केंद्र उभारली असून या केंद्रामार्फत कोविडची चाचणी केली जात आहे. गोव्याच्या जनतेच्या काळजीच्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

Goa: डेल्टा व्हेरीयंट च्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमा सील
Goa: दोडामार्ग तपासणी नाक्यावर 'कोविड' ची रॅपिड अँटीजन टेस्ट

केरी चेक नाक्यावर चोर्ला घाटातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. त्यांच्याकडे कोविडचा नकारात्मक अहवाल असणे गरजेचे आहे. किंवा जर अहवाल नसल्यास खाजगी संस्थांनी सुरु केलेल्या कोविड चाचणी केंद्रात कोविडची रॅपिट अँटीजन चाचणी करून नकारात्मक अहवाल सादर केल्यास प्रवेश दिला जात आहे . तर कोविड पॉझिटिव्ह लोकांना गोव्यात प्रवेश बंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com