Canacona Fire News: काणकोणात आगीचे थैमान! दागिने वितळले, गाद्या जळाल्या; 2 मुलींसह महिला बचावली

Goa Fire News: काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, या म्हणीची प्रचीती चावडी- काणकोण येथील दोन मुलींसह एका महिलेला आली. या तिघीही आगीच्या मोठ्या दुर्घटनेतून सहीसलामत बचावल्या.
Fire News
Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, या म्हणीची प्रचीती चावडी- काणकोण येथील दोन मुलींसह एका महिलेला आली. या तिघीही आगीच्या मोठ्या दुर्घटनेतून सहीसलामत बचावल्या.

सविस्तर माहिती अशी, की चावडी येथील एका इमारतीमधील फ्लॅटला सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. ज्या फ्लॅटला आग लागली, त्यामध्ये एक मुलगी, तर शेजारच्या फ्लॅटमध्ये एक मुलगी आणि तिची आई राहात होती. दोन्ही फ्लॅटमधील रहिवाशांना आग लागल्याची अजिबात कल्पना आली नाही.

इमारतीमधील इतर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी धुराचे लोट पाहून त्यांची दारे ठोठावली आणि त्या दोन्ही फ्लॅटमधील रहिवाशांना बाहेर काढले. तसेच स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर सुरक्षित जागी हलविल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. फ्लॅटमधील गाद्यांनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. आगीचा भडका एवढा जबरदस्त होता, की जेराल्ड फर्नांडिस यांच्या कपाटातील कपडे जळून खाक होण्याबरोबरच दागिनेही वितळून गेले.

Fire News
Cuncolim IDC Fire: बेचिराख! कुंकळ्ळी आयडीसी परिसरात आगीचे थैमान; लाखोंचे साहित्य जळून खाक

हायड्रंट नादुरुस्त; केंद्र दूरवर

काणकोण येथील अग्निशामक केंद्र चावडीपासून सुमारे चार किमी अंतरावर चापोली येथे हलविले आहे. त्यामुळे अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो. त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी पूर्वी अग्निशामक केंद्र होते, त्याठिकाणी हायड्रंट आहे. मात्र, त्यात बिघाड झाला आहे, असे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले.

Fire News
St. Lawrence Church Fire: सिकेरीतील सेंट लॉरेन्स चर्चमध्ये आग, सुदैवाने जीवीतहानी टळली; शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

पणजी चर्चजवळ रिकाम्या घराला आग

पणजी चर्चजवळील एका रिकाम्या घराला मंगळवारी पहाटे भीषण आग लागून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.

पहाटे ५ वाजता या घटनेची माहिती पोलिसांकडून अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला देण्यात आली. अवघ्या १० मिनिटांत पणजी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग शमविण्याचा प्रयत्न केला. घर लाकडी बांधकामाचे असल्याने आगीने काही क्षणांतच रूद्र रूप धारण केले. आग नियंत्रणात येत नसल्याने अग्निशमन मुख्यालयातून दुसरी गाडी आणून नियंत्रण मिळविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com