Goa Crime News: गौरवविरोधात आरोपपत्र दाखल; दीक्षा गंगवार खून प्रकरण

Cuncolim Police: कुंकळ्‍ळी पोलिसांनी न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले
Cuncolim Police: कुंकळ्‍ळी पोलिसांनी न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले
Goa Crime Dainik Gomantak

आपल्‍या अनैतिक संबंधांची माहिती उघड्यावर येऊ नये यासाठी आपली पत्‍नी दीक्षा गंगवार हिला काब-द-राम समुद्रात बुडवून तिचा खून केल्‍याचा आरोप असलेला हॉटेल मॅनेजर गौरव कटियार (२९) याच्‍याविरोधात कुंकळ्‍ळी पोलिसांनी न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

२१ जानेवारी २०२४ या दिवशी ही खुनाची घटना घडली होती. काेलवा येथील एका तारांकित हॉटेलात व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करणारा गौरव हा मूळ उत्तरप्रदेश येथील असून त्‍याची पत्‍नी दीक्षा ही गावात राहात होती.

मात्र, त्‍यावेळी ती आपल्‍या पतीकडे गोव्‍यात राहण्‍यासाठी आली असता २१ जानेवारी रोजी गौरवने तिला गोव्‍याची सैर घडवून आणण्‍याच्‍या बहाण्‍याने काब-द-राम येेथे आणले आणि तेथील खडकाळ अशा जागेत नेऊन पाण्‍यात बुडवून तिचा खून केला.

सुरवातीला हा प्रकार अनैसर्गिक मृत्‍यूचा वाटला. मात्र, कुंकळ्‍ळी पोलिसांनी सखोल चौकशी केल्‍यानंतर हा खुनाचा प्रकार हे उघड झाले होते. कुंकळ्‍ळीचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी या प्रकरणात तपास केला होता.

Cuncolim Police: कुंकळ्‍ळी पोलिसांनी न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले
Cabo de Rama: गोव्याच्या पर्यटनात महत्वाची भूमिका गाजवणारा 'काबो दि रामा किल्ला'

अनैतिक संबंधांची किनार

गौरवचे जरी लग्‍न झालेेले असले तरी त्‍याचे आणखी एका महिलेशी अनैतिक संबंध होते. गोव्‍यात आल्‍यावर त्‍याच्‍या पत्‍नीला या संबंधांची कुणकुण लागली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात वादही होत होते. आपल्‍या अनैतिक संबंधांची पत्‍नीकडून वाच्‍यता होण्‍याची भीती असल्‍याने त्‍याने तिचा काटा काढला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com