टीएमसी-एमजीपी युती सरकार स्थापन करेल: चर्चिल

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने टीएमसी-एमजीपीला पाठिंबा द्यावा: चर्चिल
Charchil Alemao Statment On MGP-TMC alliance for goa election
Charchil Alemao Statment On MGP-TMC alliance for goa election Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: तृणमूल काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी एमजीपी सोबत आघाडी करून गोव्यात सरकार स्थापन करेल. जर विरोधी पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने टीएमसी-एमजीपीला पाठिंबा द्यावा, असे चर्चिल (Charchil Alemao) यांनी म्हटले आहे. (Charchil Alemao Statment On MGP-TMC alliance for goa election)

Charchil Alemao Statment On MGP-TMC alliance for goa election
15 मे नंतर व्हॉट्सअ‍ॅपचे अकाउंट बंद होणार नाही, तर आपल्या सर्व सेवा बंद केल्या जातील

चर्चिल म्हणाले की, टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banejree) या प्रकरणांवर निर्णय घेतील. महिला, तरुण आणि बेरोजगारांच्या फायद्यासाठी त्यांनी जाहीर केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यास पक्ष उत्सुक असल्याचेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पक्ष बाणावली आणि नावेली मतदारसंघांसह 10 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, या मतदारसंघात आलेमाव आणि त्यांची मुलगी वालांका यांनी टीएमसी बॅनरवर निवडणूक लढवली होती.

“एमजीपीलाही (MGP) काही जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. एकत्रितपणे सरकार स्थापन करण्याचा आम्हाला विश्वास आहे. तसे न केल्यास आम्ही ममता दीदींसोबत बसून पुढील कृती ठरवू. टीएमसीने निवडणूक जाहीरनाम्यात सादर केलेल्या योजनांची अंमलबजावणी आम्ही नक्की करू, टीएमसीने महिला आणि तरुणांसाठी जाहीर केलेल्या सर्व योजना पक्षाकडून लागू केल्या जातील, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com