Goa: चापोली धरण जलाशय ओव्हरप्लो

चापोली धरण जलाशयाची पाणी धारण करण्याची क्षमता 38.75 आर एल.आहे. जी आज 38.80 आर एल झाली आहे.
चापोली धरण जलाशय
चापोली धरण जलाशयDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: काणकोण (Canacona) मधील चापोली धरण (Chapoli Dam) जलाशय आज पहाटे 5.30 वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. चापोली धरण जलाशयाची पाणी धारण करण्याची क्षमता 38.75 आर एल.आहे. आज जलाशयात 38.80 आर एल म्हणजेच 1127.20 हेक्टोमीटर पाणी साठा झाल्याने वाहू लागले. काल दिवसभर काणकोणात 3.6 इंच पावसाची नोंद झाली. प्रथमच जलाशय जुलै महिन्यात भरून वाहू लागला आहे. (Chapoli Dam reservoir overflow in Goa)

चापोली धरण
चापोली धरण Dainik Gomantak

गुरूवारी धरणात 38.41 आर.एल. म्हणजेच 1089 हेक्टोमीटर पाणीसाठा होता. धरण जलाशयाची क्षमता 38.75 आर.एल.आहे. म्हणजेच जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहण्यास फक्त 0.34 आर.एल पाण्याची आवश्यकता होती. ती काल झालेल्या पावसाने भरून काढली आहे. गुरूवारी सकाळी 9 वाजता संपलेल्या चोवीस तासांत 8 एम एम पावसाची नोंद झाली होती तरी गुरुवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी काणकोणात बरसल्या. आता पर्यत काणकोणात 91.28 इंच पाऊस झाला आहे.20 जुलै पर्यत काणकोणात 85.69 इंच पाऊस झाला होता. 14 जुलैपर्यत काणकोणात 71.92 इंच पाऊस झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com