Sancoale :गॅस चोरीचा घोळ संपेना; सांकवाळ येथे एजन्सी कर्मचारी अन् ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद

गॅस सिलिंडर घोळाने ग्राहक संतापले
LPG cylinder
LPG cylinder Dainik Gomantak

गोवा राज्यात घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यवसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरणारी टोळी सक्रिय असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यानंतर आता सांकवाळ येथे गॅस सिलिंडरच्या वजनात तफावत असल्याची शंका आल्याने नागरिक अन् एजन्सी कर्मचारी यांच्यात आज खंडाजंगी पहायला मिळाली.

LPG cylinder
Rajesh Pednekar IFFI 2022: ‘वाघ्रो’नंतर आता आणखी एक मोहेंजोदडो' - राजेश पेडणेकर

मिळालेल्या माहितीनुसार आज घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहक सांकवाळ येथे वाहनाच्या प्रतिक्षेत होते. काही वेळाने हे वाहन सांकवाळ येथे दाखल झाले. यानंतर ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेण्यास सुरु केली. मात्र थोड्या वेळातच काही नागरीकांना सिलिंडरच्या वजनात तफावत असल्याची शंका आली. अन् याबद्दल गॅस एजन्सीचे कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली. यावेळी गॅस एजन्सीचे कर्मचाऱ्यांनी उडावा- उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LPG cylinder
Goa News: 'समुद्री परिसंस्थेसाठी रांजा मासा महत्त्वाचा' - आदित्य काकोडकर

ग्राहक अन् गॅस एजन्सीचे कर्मचाऱ्यांच्यात वाद झाल्यानंतर थोड्या वेळातच गॅस एजन्सीचे चालक आणि कर्मचारी वाहन सोडून लोकांपासून दूर जात सिलिंडरची तपासणी करु लागले. यावेळी मात्र ग्राहकांना आपली फसवणूक सुरु असल्याचे स्पष्ट झाले.

सांकवाळ नागरीकांनी या प्रकरणावरुन तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या वादाने गोव्यात यापुर्वी झालेल्या व्यवसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरून ते सिलिंडर परस्पर राज्यांतील तारांकीत हॉटेल्सना विकण्याची टोळी सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणासारखे काही रॅकेट आहे का? अशी शंका नागरीकांनी यावेळी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com