Anjuna Crime: आता माझी सटकली! कामाच्या ठिकाणावरुन हॉटेलमध्ये कामगाराचा हाय व्होल्टेज ड्रामा

Anjuna Goa: ड्युटीचे ठिकाण बदल्यामुळे उत्तर गोव्यातील हणजूण येथे कामगाराने धिंगाणा घातला.
Anjuna Goa: ड्युटीचे ठिकाण बदललं, कामगाराकडून रुमला आग लावण्याचा प्रयत्न, जीवन संपविण्याची धमकी; हॉटेलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
ArrestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

हणजूण: ड्युटीचे ठिकाण बदलल्यामुळे नाराज कामागाराने हणजूण येथील एका खासगी हॉटेलमध्ये राडा घातला. कामगाराने हॉटेलमधील रुमला आग लावून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अखेर या कामगाराला अटक केली. सोमवारी (दि. १९ ऑगस्ट) दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण येथील एका खासगी हॉटेलमध्ये कागाराच्या ड्युटीचे ठिकाण बदलल्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचे पाहायला मिळाले.

एका ३५ वर्षीय कामगाराच्या ड्युटीचे ठिकाण हॉटेल व्यस्थापनाकडून बदलण्यात आले. या निर्णयामुळे नाराज झालेल्या कामगाराने चक्क हॉटेल रुमलाच आग लावण्याचा प्रयत्न केला.

एवढेच नव्हे तर जीवन संपविण्याची धमकी हॉटेल प्रशासनाला दिली. यावरुन हॉटेलमध्ये बराचवेळ हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अखेर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कामगाराविरोधात १५१ अंतर्गत कारवाई करत अटक केली आहे. पुढील तपास हणजूण पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Apple Support Scam Goa
Mokhard Sisters Death Case
Rape Case Promise of Marriage Goa
Tourist Drowns In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com