Chandrakant Kavalekar
Chandrakant KavalekarDainik Gomantak

चंद्रकांत कवळेकर यांची भाजपच्या राज्य उपाध्यक्षपदी वर्णी

गोवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा सत्ता मिळावली.
Published on

गोवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा सत्ता मिळावली. सत्ता मिळवल्यानंतर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी संभाळली होती. यातच आता गोवा भाजपमधील एका बड्या नेत्याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. (Chandrakant Kavalekar has been elected as the state vice president of Goa BJP)

दरम्यान, गोवा भाजपच्या (BJP) राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Chandrakant Kavalekar) यांची निवड करण्यात आली आहे. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्षपदी सदानंद शेट तानावडे आहेत. कवळेकर यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Chandrakant Kavalekar
राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनाची पायाभरणी

तसेच, केंद्र स्तरावर होत असलेले पक्षातर्गंत बदल लक्षात घेऊन गोवा भाजप देखील अनेक बदल करत आहे. चंद्रकांत कवळेकर यांच्यावर खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com