Chandor: भोज, कदंब काळातील राजधानी असलेले गाव; गौरवशाली इतिहास समजून घेण्यासाठी उपक्रम; रोख रक्कम, पदके जिंकण्याची संधी

Lost Legend of Chandor- A Treasure Hunt: या उपक्रमांद्वारे येत्या रविवारी चांदर हा संपूर्ण गावच अनोख्या स्पर्धेचे मैदान बनणार आहे आणि या स्पर्धेत रोख रक्कम, ट्रॉफी आणि पदके जिंकण्याची संधी स्पर्धकांना आहे.
Chandor Village Goa, Lost Legend of Chandor- A Treasure Hunt
Chandor Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: चांदर हे गाव गोव्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. एकेकाळी चंद्रपुरा म्हणून ओळखले जाणारे हे गाव प्रथम भोजांच्या काळात नंतर कदंब राजाच्‍या कारकिर्दीत राजधानीचे गाव होते. आज तिथे जुन्या किल्ल्याचे अवशेष आणि नंदीबैलाचे तुटके शिल्प वगळता त्या गौरवशाली भूतकाळाचे काही उरलेले नाही.

येत्या रविवारी 18 मे रोजी या ऐतिहासिक गावात तिथल्या विविध प्रकारच्या खजिन्याचा शोध घेण्याची संधी तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे बस्स फक्त एक मोबाईल फोन आणि सायकल हवी. सायकलवर स्वार होऊन ''चांदरचा लुप्त वारसा- खजिन्याचा शोध'' (लॉस्ट लेजंड ऑफ चांदोर- अ ट्रेजर हंट) या उपक्रमात, आयोजकांकडून दिल्या गेलेल्या संकेतांवरून गावातील महत्त्वाच्या स्थळांचा घ्यायचा आहे. ''सिंपलीज''चे अडोनिस रॉड्रिग्ज, फ्रेझर फर्नांडिस, स्नेशिया पॅक्सोटो आणि सानिता दिनिझ यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे.

या उपक्रमांद्वारे येत्या रविवारी चांदर हा संपूर्ण गावच अनोख्या स्पर्धेचे मैदान बनणार आहे आणि या स्पर्धेत रोख रक्कम, ट्रॉफी आणि पदके जिंकण्याची संधी स्पर्धकांना आहे. आयोजक सांगतात, ''चांदोरचा समृद्ध वारसा आणि संस्कृती याबद्दल शिक्षित करण्यासाठी हा उपक्रम लोकांना नक्कीच मदत करेन आणि मनोरंजक पद्धतीने त्यांना इतिहासाचे ज्ञान होऊ शकेल तसेच इथल्या समुदायाशी त्यांचे बंधनही निर्माण होईल.

Chandor Village Goa, Lost Legend of Chandor- A Treasure Hunt
Chandor Temple Restoration: चांदर येथील प्राचीन महादेव मंदिराची पुनर्बांधणीची मागणी, नंदी व इतर अवशेष पुरातत्त्व विभागाकडून जतन

या गावात फुटबॉल, क्रिकेट वगैरे खेळांच्या स्पर्धा सतत होत असतात; मात्र यास साऱ्या स्पर्धा व्यावसायिक रूपाने केवळ एक ''इव्हेंट'' बनलेल्या आहेत. या उपक्रमाच्या आयोजकांना काहीतरी वेगळे आणि साऱ्या गावाशी संबंधित असलेले काहीतरी करायचे होते. आयोजकांपैकी असलेले अडोनिस रॉड्रिग्ज गोव्यातील सण, परंपरा आणि संस्कृती यांचा आनंद घेणारे ''कंटेंट क्रियेटर'' आहेत. गोव्याच्या परंपरा आणि उत्सव दर्शवणारे व्हिडिओ आणि रील ते तयार करत असतात. गोव्याच्या स्थानिक कथांबद्दल त्यांना उत्कटता आहे त्यातूनच त्यांना हा उपक्रम आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली.

Chandor Village Goa, Lost Legend of Chandor- A Treasure Hunt
Chandor Panchayat: वारसा स्थळात चांदर पंचायत आदर्श ठरेल: युरी आलेमाव

सहभागी झालेल्‍यांसाठी...

या स्पर्धेत सहभागीं झालेल्यांना गावातील विविध वैशिष्ट्यांचे संकेत दिले जातील. त्या संकेतांवरून त्यांनी ही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे शोधायची आहेत. ऐतिहासिक ठिकाणे किंवा वस्तू याबद्दल दिलेल्या संकेतांवरून स्पर्धेतील सहभागींना ऑनलाईन जाऊन अधिक माहिती मिळवावी लागेल. यातून त्यांना या गावाबद्दल अधिकाधिक जाणून घेता येईल. आतापर्यंत या स्पर्धेसाठी अनेकांनी स्वतःचे नाव नोंदले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com