Goa Tourism Ultimate Reel Showdown Competition: गोवा पर्यटन खात्याने 'अल्टीमेट रील शोडाऊन' स्पर्धा आयोजित केली आहे, ही गोव्यातील कमी ज्ञात आणि वैविध्यपूर्ण पैलूंचे प्रदर्शन करण्याची एक रोमांचक संधी आहे.
गोव्याच्या जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे जाऊन, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य, गॅस्ट्रोनॉमिकल आनंद आणि गोव्याला खरोखरच खास बनवणाऱ्याआणखी नयनरम्य बनवणाऱ्या गोष्टी समोर आणणे आहे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
स्पर्धेकांना गोव्याचे सार टिपणाऱ्या सहा अनोख्या विषयांवर रील करता येणार आहे.
सहा विषय
गोव्यातील अध्यात्मिक पर्यटन, होम स्टे, समुद्रकिनार्यांच्या पलीकडील गोवा, गोव्याचे ट्रेक्स, गोव्याचा निसर्ग आणि गोव्याच्या पाककृती या सहा विषयांवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धक रील्स तयार करू शकतात.
या स्पर्धेमुळे स्पर्धकांना गोव्यातील लपलेल्या सौंदर्याची सखोल माहिती मिळेल सोबत गोव्याचे वैविध्यपूर्ण सौंदर्य जगाला दाखविणारी आकर्षक कलाकृती तयार करण्याची संधी आहे.
अल्टिमेट रील शोडाउन’ स्पर्धा सर्व वयोगटातील सहभागींसाठी खुली आहे जी सर्वांसाठी सार्वजनिक आहे. कारण गोव्यातील लपलेल्या खजिन्याचा शोध घेण्याची आणि ते जगासोबत शेअर करण्याची संधी आहे.
असे होईल रिलचे मूल्यांकन
सर्जनशीलता आणि अस्सलपणा, व्हिडिओची सुस्पष्ट आणि चांगली दृक श्राव्य गुणवत्ता, विषयाच्या अनुसरून रीलची निर्मिती, लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आणि रिच या सर्व निकषांवर तज्ज्ञ परीक्षकांची समिती स्पर्धेचे मूल्यांकन करतील.
एक लाख जिंकण्याची संधी
स्पर्धेतून 3 विजेते निवडले जातील. तृतीय क्रमांकासाठी 25,000/-रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000/- रुपये आणि प्रथम क्रमांकासाठी 1,00,000/- रुपये रोख पारितोषिके दिली जातील.
नियम व अटी
#TheReelGoa हा अधिकृत हॅशटॅग वापरून दिलेल्या विषयांवर आधारित 60-90 सेकंदाचा व्हिडिओ [9:16 गुणोत्तर] तयार करून स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. रील पोस्ट करताना स्पर्धकांस रील मध्ये @goatourism टॅग करणे अनिवार्य आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहिती आणि स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी गोवा पर्यटन खात्याच्या संकेतस्थळाला भेट देता येईल. तसेच, पर्यटन खात्याने सर्वांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.