Champal Department: 7 महिन्यांत 630 वन्यजीवांची सुटका

कांपाल विभागाची कामगिरी साप, मगर, उदमांजर आदी प्राण्‍यांसह पक्ष्‍यांचा समावेश
Champal Department
Champal DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

Champal Department: मनुष्यवस्तीत आलेल्या किंवा सापडलेल्या वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सात महिन्यांत कांपाल वन्यजीव विभागाने ६३० वन्यजीवांची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. सुटका केलेल्या वन्यजीवांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून या वन्यजीवांत विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे.

Champal Department
Matoli Bazar: म्हापशात माटोळी बाजारासाठी संपूर्ण ‘लेन’

कांपाल वन्यजीव परिक्षेत्राचे वन अधिकारी तुकाराम खर्बे म्हणाले,की वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन कायदा १९७२ नुसार कोणत्याही प्रकारचा वन्यजीव पकडणे, सांभाळणे अथवा बंदिवासात ठेवणे गुन्हा आहे.

हे वन्यजीव कायद्याच्या विविध प्रकारच्या कलम आणि परिशिष्टानुसार गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. मात्र, काही वेळेला वन्यजीव आपला नैसर्गिक अधिवास सोडून मनुष्यवस्तीकडे वळतात.

Champal Department
Goa Sand Mining: कामुर्लीत रेती उपसा सुरूच

अथवा मनुष्यवस्तीत शिरतात. त्यांना पकडून पुन्हा त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. यासाठी कांपाल परिक्षेत्रात २४ तास विशेष प्रशिक्षित कर्मचारी तैनात असतात. केवळ दूरध्वनी करून त्यांना बोलावता येते.

दिवसेंदिवस अशा घटनांत वाढ होताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात ६३ वन्यजीवांना पकडले असले तरी जुलै महिन्यात ११९ वन्यजीवांना पकडून मूळ अधिवासात सोडण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यात ६३० प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना वनविभागाने जीवदान दिले आहे.

Champal Department
Karnataka Bus Accident At Goa: चालकाला लागली डुलकी; कर्नाटकची बस आगशीत उलटली...

राजभवनात आलेल्या आठ फुटी मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी चाललेली तयारी पाहताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई.

‘त्या’ मगरीला जीवदान

राजभवन परिसरात बुधवारी ८ फूट लांबीची मगर आढळून आली. ती दलदलीत आढळणारी पूर्ण वाढ झालेली मगर होती. या घटनेची माहिती मिळताच राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या कार्यालयाकडून तत्काळ वनविभागाला सूचित करण्यात आले. त्यानंतर वनविभागाचे एक पथक राजभवनात आले. राज्यपालांच्या देखरेखीखालीच या मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com