गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान

प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी
Goa Government
Goa Government Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेला सोसायटी निबंधकांसमोर आव्हान देण्यात आले असून ही प्रक्रिया सुमारे 17 हजार सदस्यांना अंधारात ठेवून सुरू केल्याने ती त्वरित बंद करून प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी केली आहे.

गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या सांगे विभागाचे खजिनदार असलेले अनिल सावंत देसाई यांनी ही आव्हान याचिका दाखल केली असून ही निवडणूक प्रक्रिया पूर्णतः अपारदर्शक असल्याचा आरोप केला आहे. गोवा सरकारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत देविदास यांच्या समितीने ही प्रक्रिया सुरू केली असून उमेदवारी अर्जही भरून घेतले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

वर्षभर बेकायदा व्यवस्थापन

या समितीचा कार्यकाळ मे 2021मध्ये संपुष्टात आला असतानाही विद्यमान समितीने एक वर्ष बेकायदा व्यवस्थापन हाताळले. यादरम्यान या समितीने बोलावलेल्या आमसभेला न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही ती बेकायदेशीरपणे घेतल्याचा आक्षेप यापूर्वी घेतला होता.

Goa Government
'गोव्यातील पंचायत निवडणुका 12 जूनला शक्य'

सदस्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप

अनिल सावंत यांनी याला आव्हान देताना ही निवडणूक प्रक्रिया राबवताना बहुतेक सदस्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप केला. मागच्या कित्येक वर्षांत मतदार यादी परिपूर्ण केलेली नाही. तालुका समित्यांना ही यादी उपलब्ध करून दिलेली नाही, याकडे लक्ष वेधताना ही निडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी जी आमसभा घेतली, तीच मुळात बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Healthcare Expenditure
Goa State Women Commission Vacancy
Colvale Jail Inmate Attack News
Supreme Court Casino GST Verdict
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com