Candolim Murder Case: ''मुलाला भेटू दिले नाही; मला सूचनाशी बोलायचं नाही'', व्यंकटरमणचा पोलीसांसमोर खुलासा

Candolim Murder Case: व्यंकटरमणचा अधिकृत जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे.
Venkatraman
Venkatraman Dainik Gomantak

Candolim Murder Case: गोव्यासह देशात गाजणाऱ्या गोव्यातील सिकेरी येथील हॉटेलमध्ये झालेल्या ४ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेली सूचना सेठ, तिचा पती व्यंकटरमण यांच्याबद्दल रोज निरनिराळी माहिती समोर येतेय.

या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी सूचनांच्या नवऱ्याला काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावरून आज 13 जानेवारीला अखेर सूचनाचा नवरा व्यंकटरमण वकिलांसोबत कळंगुट पोलिस स्थानकांत दाखल झाला.

त्याने आतापर्यंत दिलेल्या माहितीत, त्यांच्यामध्ये मुलाच्या कस्टडीवरून न्यायालयीन लढाई सुरू होती. यात कोर्टाने दर रविवारी मुलाला भेटायची परवानगी व्यंकटरमणला दिली होती.

Venkatraman
कोणते नवीन खुलासे होणार? खुनातील संशयित सूचनाचा पती कळंगुट पोलीस स्थानकात हजर

न्यायालयाने दर रविवारी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात यावा, असा आदेश 20 नोव्हेंबर 2023 रोजी सूचनाला दिला होता. या आदेशानुसार सूचनाने तीन रविवारी चिन्मयची भेट घडवून आणली.

सूचनाने त्यानंतरचे पाच रविवार आमची भेट होऊ दिली नाही आणि शेवटी 5 जानेवारी रोजी मेसेज करून मला 7 जानेवारीला भेटण्यासाठी गोव्यात बोलावले होते. मात्र नंतर मला मुलाच्या हत्येची बातमी समजली, अशी माहिती त्याने दिलीय.

व्यंकटरमणचा अधिकृत जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे. मात्र त्याने ''मला माझ्या मुलाला भेटू दिले नाही; मला सूचनाशी बोलायचं नाही'' असे बोलल्याचे समजतेय.

Venkatraman
Venkatraman Dainik Gomantak

दोन दिवसांपूर्वी पोलिसांना सूचनाच्या बॅगेत मिळालेल्या चिट्ठीवरून तिचे आणि तिच्या नवऱ्याचे संबंध बिघडले असून त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली.

कळंगुट पोलीस स्थानकात असलेल्या सूचनाने काल 12 जानेवारीच्या सकाळपर्यंत पोलिसांसमोर कोणतीही माहिती उघड केली नव्हती. मात्र काल पोलिसांना तिला बोलतं करण्यात यश आलं.

संध्याकाळी 4 च्या सुमारास ती गुन्ह्यादिवशी घडलेला घटनाक्रम म्हणजेच क्राईम सीन रिक्रिएट करण्यास तयार झाली.

काल पर्यंत सूचनाकडून मिळालेल्या माहितीवरून तिने आपल्या मुलाचा मृतदेह बॅगेत भरला असून तो कसा मृत झाला किंवा त्याला कोणी मारला हे तिने सीन रिक्रिएटवेळी पोलीस चौकशी सांगितले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com