Mhadei Water Dispute: 'गोव्यामुळेच म्हादईचा प्रश्‍न ताटकळत राहिला, गोमंतकीयांची सावंत सरकारला चिंता नाही', अंजली निंबाळकर बरसल्या

Anjali Nimbalkar On Mhadei Water Dispute Statement: म्हादई पाणी वितरणाचा प्रश्‍न हा केंद्र व राज्य सरकारचा विषय आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी एकत्रित बैठक घेण्यास केंद्राला यापूर्वीच पत्र पाठवले आहे.
Anjali Nimbalkar On Mhadei Water Dispute Statement
Anjali NimbalkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हादई पाणी वितरणाचा प्रश्‍न हा केंद्र व राज्य सरकारचा विषय आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी एकत्रित बैठक घेण्यास केंद्राला यापूर्वीच पत्र पाठवले आहे. गोव्यातील जनतेची मुख्यमंत्र्यांना चिंता असेल तर त्यांनी एकत्रित बैठक घेण्यासाठी गोव्यातर्फे केंद्राला पत्र पाठवावे, असे ठोस उत्तर अखिल काँग्रेसच्या गोवा प्रभारी सचिव अंजली निंबाळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या म्हादईच्या प्रश्‍नावर दिले.

गोव्याच्या (Goa) मुख्यमंत्र्यांना गोमंतकियांना पाणी मिळण्यासंदर्भात कोणतीच चिंता नाही. त्यांना केंद्राला किंवा पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची हिंमत नाही,असेही त्या म्हणाल्या.

Anjali Nimbalkar On Mhadei Water Dispute Statement
Mhadei Water Dispute: कळसा - भांडुरा प्रकल्प रद्द करा; आता कर्नाटकातील शेतकरीही गोव्यासोबत, म्हादईचे पाणी वळवण्याला विरोध

पंतप्रधानानी कर्नाटक (Karnataka), गोवा व केंद्र सरकारची एकत्रित संयुक्त बैठक बोलावून या म्हादई प्रश्‍नावर कायमचा तोडगा काढावा. जेव्हा माझी काँग्रेसच्या गोवा प्रभारी म्हणून नेमणूक झाली तेव्हा मी या प्रश्‍नावर उत्तर दिले होते. ज्या राज्याला म्हादईचा पाण्याचा हक्क मिळायला हवा यासंदर्भात चर्चा होण्याची गरज आहे. कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानाना पत्र पाठवले आहे. मात्र गोव्याच्या जनतेला म्हादईचे पाणी मिळावे यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. पिण्याच्या पाण्याची किंवा जनतेची त्यांना चिंता नाही, असा आरोप निंबाळकर यांनी केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com