Goa News: पर्वरी खाडीसाठी 23.56 कोटींचा निधी मंजूर; रेल्वेस्थानक विकासासाठी 250 कोटी

Central Government Funds For Goa: केंद्र सरकारने पर्वरी खाडी विकासासाठी २३.५६ कोटी रुपये तर कोलवा किनारा सौंदर्यीकरणासाठी १५.६५ कोटी रुपये २० ऑगस्ट रोजी मंजूर केले असल्याची माहिती राज्यसभेतील लेखी उत्तरात दिली आहे.
Porvorim Creek
Porvorim Creek DevelopmentDainik Gomantak
Published on
Updated on

Central Government Funds For Goa Development

पणजी: केंद्र सरकारने पर्वरी खाडी विकासासाठी २३.५६ कोटी रुपये तर कोलवा किनारा सौंदर्यीकरणासाठी १५.६५ कोटी रुपये २० ऑगस्ट रोजी मंजूर केले असल्याची माहिती राज्यसभेतील लेखी उत्तरात दिली आहे. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न विचारला होता.

लेखी उत्तरात म्हटले आहे, की स्वदेश दर्शन योजनेखाली सिकेरी -बागा, हणजणे- वागातोर, मोरजी- केरी, आग्वाद किल्ला आणि तुरुंग विकास यासाठी ९७.६५ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी ९२.७६ कोटी रुपये खर्च केले आहेत. दोनापावल ते कोलवा- बाणावली विभागातील विकासकामांसाठी ९९.३५ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी त्यापैकी ९४.३८ कोटी रुपये खर्च केले आहेत.

केंद्रीय सहायता योजनेंतर्गत मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनल इमारतीसाठी ८७९.०४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.त्यापैकी ७६७.१७ कोटी रुपये राज्य सरकारला वितरीत करण्यात आले आहेत.

रेल्वेस्थानक विकासासाठी २५० कोटी

मडगाव, थिवी आणि करमळी रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तर त्यातील २०० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मुरगाव येथे इमिग्रेशन सुविधांचा विकास आणि क्रूझ बर्थ खोलीकरणासाठी १३१६.४० लाख रुपये मंजूर झाले आणि त्यापैकी ६५८.२० लाख रुपये राज्य सरकारला दिले आहेत. .

Porvorim Creek
Tanvi Vasta Case: 'तन्‍वी' प्रकरणात 'काही' बिल्‍डरही गाेत्‍यात येण्‍याची शक्‍यता! 'नेट बँकिंग'ची माहिती नसलेले अनेकजण झाले शिकार

स्थानिक उत्सवांना पाठिंबा देण्यासाठी २०२०-२१ ते २०२२ ते २३ दरम्यान कार्निव्हल व शिमगोत्सवासाठी दरवर्षी प्रत्येकी २५ लाख रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत, अशी माहिती लेखी उत्तरात दिली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com