E Visa : ई-व्‍हिसाचा प्रश्‍‍न सुटेना; केंद्राकडून गोव्‍याला दिलासा नाहीच

युरोपीय देशांतून यंदा अपेक्षित प्रमाणात पर्यटक गोव्‍यात दाखल झालेले नाहीत. तरीही यंदाचा पर्यटन हंगाम चांगला जाईल, अशी अशी अपेक्षा आहे
Visa Application
Visa ApplicationDainik Gomantak

E Visa : ई-व्‍हिसा पद्धत बंद झाल्‍याने ब्रिटनचे पर्यटक रोडावत आहेत, हे वास्‍तव लक्षात आल्‍यावर राज्‍य सरकारच्‍या वतीने केंद्राकडे पाठपुरावा करण्‍यात आला. ई-व्‍हिसा सुरू होईल, याबाबत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तारखेसह आश्‍‍वस्‍त केले होते. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनीही तसे आश्‍‍वासन दिले होते. तथापि, त्‍यानंतर बरेच दिवस उलटूनही ई-व्‍हिसाचा प्रश्‍‍न खोळंबला आहे. दरम्यान, पर्यटनमंत्री खंवटे यांनी युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक हे याप्रश्‍‍नी तोडगा काढतील, अशी अपेक्षा ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे.

युरोपीय देशांतून यंदा अपेक्षित प्रमाणात पर्यटक गोव्‍यात दाखल झालेले नाहीत. तरीही यंदाचा पर्यटन हंगाम चांगला जाईल, अशी अशी अपेक्षा आहे. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये मोठी वाढ होणार असल्याची अपेक्षा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली आहे. युकेचे प्रधानमंत्री ऋषी सुनक ई-व्हिसा प्रकरण सोडवतील अशी आशा त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. गोव्यासारख्या लहान राज्याला दोन विमानतळ मिळतात हे आमचे भाग्यच आहे. त्याचा फायदा राज्याला निश्‍चितच मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Visa Application
Attack after Accident : अपघातानंतर वाद; म्हापशात पिता-पुत्रावर सुरीहल्ला!

म्‍हणून रोड-शोमध्‍ये सहभाग नाही!

गोव्याला दर्जेदार पर्यटक हवे आहेत, त्यासाठी नियोजित चार्टड विमाने आली पाहिजेत. आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट, ‘रोड शो’सारख्या उपक्रमातून मिळणारे पर्यटक गोव्यात आल्यावर खर्च करण्‍यास मागेपुढे पाहतात. स्वस्त आणि मस्त जीवन जगणे, हिप्पी संस्कृती जोपासणे, अमलीपदार्थाकडे आकर्षित होणे असा प्रकार वाढतो. त्यामुळे अशा ‘रोड शो’मध्ये गोवा भागीदार झाला नाही, असेही खंवटे म्हणाले.

रशियन पर्यटकांवर भर

सध्या गोवा रशियन पर्यटकांवर जास्त भर देत आहे. 180 प्रवासी घेऊन पहिले चार्टड कझाकिस्तानमधून आले, आता नोव्हेंबरमध्ये रशियाहून 3 चार्टड येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. चार्टड विमाने वाढत जाणार आहेत हे अपेक्षित असले तरी युरोपमधील पर्यटक दुसरीकडे वळणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com