IIT Goa: सांगेतच होणार आयआयटी, रिवण येथील जागेला शिक्षण मंत्रालयाची मान्यता

सांगेत प्रस्तावित आयआयटी संकुलाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता.
IIT Goa
IIT Goa
Published on: 
Updated on: 

IIT Goa: गोवा आयआयटीचे संकुल सांगेतच होणार असल्याचे आता निश्चित झाले असून, मेळेवाडा-रिवण येथील प्रस्तावित जागेला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे.

सांगेत प्रस्तावित आयआयटी संकुलाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. दरम्यान, राज्य सरकारने सांगेतच आयआयटी संकुल होईल असे स्पष्ट केले होते, अखेर या संकुलाच्या जागेसाठी मान्यता मिळाल्याने आयआयटीचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रस्तावित जागेला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर आता जमीन हस्तांतर संबधित प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

दरम्यान, गेल्या वर्षी शेतकरी वर्गातून सांगेतील या प्रकल्पासाठी शेतकऱ्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. सप्टेंबरमध्ये जागेचे सिमांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी अडविले होते.

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर लोकांनी त्यांनाही धक्काबुक्की केली होती. आज या प्रकरणी एका आंदोलकाला अटक केल्यावर सांगे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला होता.

आयआयटीचा प्रकल्प सांगेतच व्हावा यासाठी राज्य सरकार आग्रही होते. सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले होते.

शिक्षणासारख्या पवित्र कामासाठीचा हा प्रकल्प असून प्रदूषण विरहित आहे.नम्हणूनच हा प्रकल्प सांगे येथे व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. अशी भुमिका सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaibhavi IIT success story
Satya Niketan Building Collapse Delhi
Gen Z Movement India
Diocesan Society Teachers
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com