Goa Jail: कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

Central Colvale Jail: याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी काही कैद्यांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
Central Colvale Jail Goa
Central Colvale Jail Goa Dainik Gomantak

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) विभागात झालेल्या कैद्यांमधील हाणामारी प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी काही कैद्यांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. संशयितांमध्ये उमेश राठोड, सीऑन फर्नांडिस, विकास राठोड (सर्व सेल क्रमांक 6), सादीक बेपारी, जयप्रकाश गोसाबी, रणजीत पाल, मुबारक मुल्ला, मोहम्मद आलाम, विकी बरीक, मैणूद्दीन पठाण, अनंत गावकर, अभिषेक हिरेमठ, विक्टर दोडामणी व ओमप्रकाश तरड (सर्व सेल क्रमांक 7) या कैद्यांचा समावेश आहे.

कोलवाळ कारागृहाचे अधीक्षक गौरेश कुट्टीकर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरूध्द भादंसंच्या 143, 147, 324 व 149 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुणाल नाईख हे करीत आहेत.

Central Colvale Jail Goa
Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदाचा आज होणार फैसला

दरम्यान, रविवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास कारागृहातील एनडीपीएस विभागात हाणामारीची घडली होती. कैद्यांनी जेवण घेल्यानंतर मोजणीवेळी हा प्रकार घडला होता. जखमी इझेजी किंगस्ले हा कारागृहात शौचालयात गेला होता. त्यामुळे कैद्यांची संख्या कमी दिसत होती. पुन्हा मोजणीवेळी तो परत आला. त्यावेळी ड्युटीवरील जेल गार्डने त्यास जाब विचारला. त्यावेळी संशयित कैदी तिथे आले. त्यांनी किंगल्से यास मारहाण करायला सुरुवात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com