Pernem Shigmotsav 2023: पेडण्यात शिगमोत्‍सवाचा जल्लोष

मिळाला उदंड प्रतिसाद : रोमटामेळ, वेशभूषा, चित्ररथ ठरले आकर्षण
Shigmotsav in Pernem Goa 2023
Shigmotsav in Pernem Goa 2023Dainik Gomantak

Shigmotsav 2023 in Pernem Goa: ओस्‍सय...ओस्‍सय’, ‘घुमचे कटर घूम’च्‍या गजरात आज मंगळवारी पेडणेचा शिगमोत्‍सव उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. चित्रथर, रोमटामेळ पाहण्‍यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. पर्यटन खाते आणि पेडणे शिगमोत्सव समिती यांच्‍या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्‍या या शिगमोत्‍सवाला उदंड प्रतिसाद मिळाला.

श्री आदिस्थान देवस्‍थान येथे शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर व गोवा भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बावटा दाखविल्यानंतर शिगमोत्सवाला प्रारंभ झाला.

त्‍यात छत्र्या, तोरणे, रंगबेरंगी गुढ्या नाचवत ‘घुमचे कटर घूम’च्या लयबद्ध ताल व आवाजात रोमटामेळ पुढे सरकत होते.

Shigmotsav in Pernem Goa 2023
Devdarshan Yatra: देवदर्शन योजना होणार एप्रिलपासून पूर्ववत- फळदेसाई

त्यातच वेगवेगळ्या प्रकारची लोकनृत्ये, गोफ, घोडेमोडणी, तोणयामेळ आदी प्रकारांमुळे वातावरणात रंगत आली. अखिल गोवा व पेडणे तालुका मर्यादित वेशभूषा स्पर्धाही घेण्‍यात आल्‍या.

आमदारांनी वाजवले ढोल

चित्ररथ व रोमटामेळ स्पर्धांना पथकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ढोल वाजवण्‍याचा आनंद लुटला.

तत्पूर्वी, जुन्या टॅक्सी स्थानकावर वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार आर्लेकर यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी नगराध्यक्ष माधव शणॉय देसाई, मामलेदार अनंत मळीक, पर्यटन खात्याचे संचालक श्री. तेली, पालिका मंडळ, सरपंच, पंच व मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com