गोवा धनगर समाज सेवा संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले विठू वरक तसेच देशाच्या सेवेतून निवृत्त झालेले माजी सैनिक लक्ष्मण वरक यांचा सत्कार करण्यात आले.
Celebrate

Celebrate

Dainik Gomantak

पिसुर्ले : सत्तरी तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून धनगर समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या गोवा धनगर समाज सेवा संघाचा 31वा वर्धापन दिवस दि 20 रोजी भुईपाल धनगरवाडा येथिल लईराई धोंड सभागृहात मोठ्या उत्साहात (Celebrate) साजरा करण्यात आला.

या वेळी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साल 2020-21 या वर्षा मध्ये इयत्ता दहावी, बारावी तसेच उच्चशिक्षित विद्यार्थी मिळून सुमारे 65 विद्यार्थाचा गौरव करण्यात आला त्याच प्रमाणे म्हाऊस ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले विठू वरक तसेच देशाच्या सेवेतून निवृत्त झालेले माजी सैनिक लक्ष्मण वरक यांचा सत्कार करण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Celebrate</p></div>
तृणमुल काँग्रेस हेच गोव्याचं भवितव्य : रेजिनाल्ड

तर संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेला समाज भूषण पुरस्कार (Awards) संस्थेचे कार्याध्यक्ष बाबू कोंडो झोरे यांना प्रदान करण्यात आला, तर संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे काढण्यात येणाऱ्या सन 2022 सालाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.

या प्रसंगी व्यासपीठावर नगरगाव जिल्हा पंचायत (District Panchayat) सदस्य राजेश्री काळे, होंडा पंचायतीचे सरपंच आत्मा गावकर, संस्थेचे अध्यक्ष बी डी मोटे, माजी अध्यक्ष धाकू पावणे, बाबू रामू हुमाणे, कार्याध्यक्ष बाबू कोंडो झोरे, पंच सया पावणे, पांडुरंग गावकर, नगरगाव पंच रामा खरवत, म्हाऊस पंच विठू वरक, लईराई धोंड मंडळ अध्यक्ष बया वरक, डिचोली तालुका धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप वरक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध मान्यवरांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. सुरवातीला सामुदायिक गाऱ्हाणे व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता वरक, वनीता वरक, बबीता शेळके, रुपा झोरे, महादेव वरक यांनी केले तर संस्थेचे सचिव पवन वरक यांनी आभार व्यक्त केले. भुईपाल येथे संपन्न झालेल्या गोवा धनगर समाज सेवा संघाच्या 31व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने बाबू कोंडो झोरे यांना समाज भुषण पुरस्कार प्रदान करताना नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, होंडा सरपंच आत्मा गावकर व इतर मान्यवर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com