मडगाव पालिका परिसरात 30 कॅमेरे कार्यान्वित

लोहिया मैदानाचे उद्‍घाटन 18 जून रोजी उद्‍घाटन
Margao Municipal Council
Margao Municipal Council Dainik Gomantak

सासष्टी : मडगाव नगरपालिका परिसरात 30 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. यातील 26 कॅमेरे नगरपालिका इमारतीत सर्व विभागांमध्ये तर चार इमारती सभोवताली बसवलेले आहे. तसेच लोहिया मैदानाचे उद्‍घाटनही 18 जून रोजी होईल, अशी नगराध्यक्ष माहिती लिंडन परेरा यांनी दिली. त्यांनी ताबा घेतल्यापासून आज एक वर्ष पूर्ण झाले. यावेळी मुख्य अधिकारी रोहित कदम, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ व इतर नगरसेवक उपस्थित होते.

Margao Municipal Council
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत स्टॅमिना क्लबची घोडदौड कायम

श्री. परेरा म्हणाले, एक वर्षाच्या कार्यकाळावर आपण पूर्ण समाधानी व आनंदी असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तिनही आमदार, मुख्य अधिकारी व नगरसेवकांच्या सहकार्यामुळेच मी एक वर्ष यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. एका वर्षात आपण अनेक गोष्टी करू शकलो.

एसजीपीडीए मार्केटमध्ये 5 टीबीडी प्लांट सुरू केले. सीसीटीव्ही कार्यान्वित केले. नगरपालिका प्रशासनाकडून एका वर्षात विकासकामासाठी 5 कोटी रुपये मंजूर करून घेतले. दोन बायोमॅट्रीक जे दोन वर्षांपासून बंद होते, ते दुरुस्त केले. लोहिया मैदानाच्या पहिल्या स्तरावरील काम पूर्ण झाले असून सुशोभीकरण केलेल्या मैदानाचे उद्‍घाटन 18 जून 2022 रोजी केले जाईल, असे नगराध्यक्षांनी जाहीर केले.

नगरपालिकेची गॅरेज दुरुस्त करून तेथेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. आपण मडगावकरांच्या आशा अपेक्षांना खरे उतरलो व चांगल्या प्रशासनाबरोबरच मी भ्रष्टाचारी नाही हे सिद्ध करून दाखवले, याचा अभिमान वाटतो असेही नगराध्यक्षानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com