Arvind Kejriwal: हवालाच्या पैशातून दिले गोव्यातील हॉटेल बिल; CBI म्हणाले, 'आमच्याकडे प्रकरणाची संपूर्ण चेन'

Arvind Kejriwal Arrested By CBI: किमान अकरा वेळा केजरीवाल तिथे गेले आणि ते म्हणतात 'मला आठवत नाही', हा प्रकार काही दहा वर्षापूर्वी घडला नाही.
हवालाच्या पैशातून दिले गोव्यातील हॉटेल बिल; CBI म्हणाले, 'आमच्याकडे प्रकरणाची संपूर्ण चेन'
Arvind Kejriwal Arrested By CBIDainik Gomantak

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते, त्याचे बिल हवालातून मिळालेल्या पैशांद्वारे केल्याचा खुलासा केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (CBI) केला आहे.

याबाबत सीबीआयकडे पुरावे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. केजरीवालांनी आज (दि.26 जून) सकाळी सीबीआयकडून अटक करण्यात आली.

अरविंद केजरीवाल यांनी साक्षीदार आणि पुराव्यांची कबुली द्यावी, यासाठी त्यांची कोठडी गरजेची असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांची त्यांनी शहनिशा करावी, त्यांनी मान्यच करावे असा आमचा आग्रह नाही, असे सीबीआयच्या वतीने अधिकारी डीपी सिंग यांनी कोर्टात सांगितले.

केजरीवालांना तुम्ही गोव्याला गेला होता का, तुमचे हॉटेलचे बिल कोणी दिले? याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी 'मला आठवत नाही', असे उत्तर दिल्याची माहिती सीबीआयच्या वतीने बाजु मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात दिली.

केजरीवालांचे बिल हावालाच्या पैशातून देण्यात आले. आमच्याकडे या प्रकरणाची संपूर्ण चेन आहे. कोणी काय केले? कसे झाले? आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. ते किमान अकरावेळा तिथे गेले आणि ते म्हणतात मला आठवत नाही. हा प्रकार काही दहा वर्षापूर्वी घडला नाही, असे वकील कोर्टात म्हणाले.

हवालाच्या पैशातून दिले गोव्यातील हॉटेल बिल; CBI म्हणाले, 'आमच्याकडे प्रकरणाची संपूर्ण चेन'
Goa News: दारुच्या आहारी गेलेला भाविक मंदिरात जाणार का? हिंदू जनजागृती समितीचा सवाल, निर्णयाचा निषेध

साऊथ ब्लॉकला फायदा व्हावा यासाठी दिल्लीची वादग्रस्त मद्य धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली. धोरण कसे असावे याबाबत साऊथ ब्लॉकने केलेल्या सुचनांचा पुरावा असल्याची माहिती वकिलांनी कोर्टाला दिली.

दिल्लीतील मद्य व्यवसायाचे खासगीकरण होऊ नये, अशी सूचना अबकारी आयुक्तांनी या धोरणाबाबत दिलेल्या अहवालात केली होती. धोरणाबाबत दिल्ली सरकारने लोकांच्या सूचना मागविल्या मात्र या सूचना देखील खोट्या असल्याचे पुरावे असल्याचे सिंग यांनी कोर्टात सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com