Delta Corp GST Notice: 11,140 कोटींची जीएसटी थकबाकी, कॅसिनो चालवणाऱ्या डेल्टा कॉर्प कंपनीला नोटीस

थकबाकीची बातमी समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्के घसरण झाली आहे.
Delta Corp GST Notice
Delta Corp GST NoticeDainik Gomantak
Published on
Updated on

Delta Corp GST Notice: कॅसिनो चालवणाऱ्या डेल्टा कॉर्प कंपनीला जीएसटी थकबाकीप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीवर 11,140 कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

थकबाकीची बातमी समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्के घसरण झाली आहे.

नोटीसमध्ये सरकारने कंपनीला 11 हजार 140 कोटी रुपयांचा कर, व्याज आणि दंडासह 16 हजार 822 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. डेल्टा कॉर्पवर जुलै 2017 ते 2022 या कालावधीतील जीएसटी थकबाकी आहे.

नोटीसमधील माहितीनुसार, डेल्टा कॉर्पला 11,140 कोटी आणि 5,682 कोटींची दुसरी नोटीस त्याच्या संलग्न कॅसिनो डेल्टीन डेन्जाँग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा प्लेझर क्रूझ यांना बजावण्यात आली आहे.

शुक्रवारी कंपनीचा शेअर्समध्ये 0.03 ते 0.05 पैसे बदल झाल्यानंतर तो 175.25 रुपयांवर बंद झाला, त्यापूर्वी बीएसई मार्केटमध्ये त्याची किंमत 175.30 रुपये एवढी होती. मागच्यावेळी कंपनीचे बाजारमूल्य 4692.69 कोटी रुपये एवढे आहे.

Delta Corp GST Notice
RTI अंतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण दिली, GMC च्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

दरम्यान, कंपनीला बजावण्यात आलेल्या नोटीस कायद्याच्या विरोधात आहेत असे कंपनीने म्हटले आहे. कंपनी आणि उपकंपन्या आलेल्या नोटीसांना आव्हान देण्यास कंपनी सर्व कायदेशीर पाठपुरावा करेल असेही कंपनीने म्हटले आहे.

डेल्टा कॉर्प प्रामुख्याने कॅसिनो उद्योगात सक्रिय आहे. त्याशिवाय रिअल इस्टेट, गेमिंग, हॉस्पिटॅलिटी आणि इतर क्षेत्रात कंपनीचा विस्तार झाला आहे. कंपनी DELTIN ब्रँड अंतर्गत गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय चालवते. कंपनीचे गोव्यात तीन कॅसिनो आहेत, ज्यात डेल्टिन रॉयल, डेल्टिन जेएक्यूके आणि डेल्टिन कॅरावेला यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court Casino GST Verdict
Bombay High Court Goa Bench Casino Order
Record GST Collection April 2026
Goa Mandovi River Casino Dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com