Goa AAP Mediclaim Demand
Goa AAP Mediclaim DemandDainik Gomantak

गोमंतकीयांसाठी 10 लाखांचा ‘कॅशलेस मेडिक्लेम’ लागू करा! ‘आप’ची मागणी; भाजपकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे टीकास्त्र

Goa AAP Mediclaim Demand: नाईक म्हणाले, गोव्यात आरोग्यसेवेचा खर्च प्रचंड वाढला आहे, अनेक कुटुंबे कर्जबाजारी होत आहेत. मात्र, राज्यातील सरकारची दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसएसवाय) अत्यंत अपुरी आहे.
Published on

पणजी: आम आदमी पक्षाच्या पंजाब सरकारने लागू केलेल्या ‘मुख्यमंत्री सेहत योजनेच्या (एमएमएसवाय) ‘ धर्तीवर गोव्यातील सर्व गोमंतकांसाठी १० लाख रुपयांची कॅशलेस आरोग्य विमा योजना तात्काळ लागू करावी, अशी मागणी येथील ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली आहे.

आपच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी संदेश तेलीकर देसाई यांची उपस्थिती होती. नाईक म्हणाले, गोव्यात आरोग्यसेवेचा खर्च प्रचंड वाढला आहे, अनेक कुटुंबे कर्जबाजारी होत आहेत. मात्र, राज्यातील सरकारची दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसएसवाय) अत्यंत अपुरी आहे.

Goa AAP Mediclaim Demand
Goa AAP: ‘आप’ची गोव्यात पडझड का? झेडपी निवडणुकीत झालेले पानिपत कुणामुळे?

या योजनेत तीन सदस्यांच्या कुटुंबाला फक्त २.५ लाख रुपये आणि चार किंवा अधिक सदस्यांच्या कुटुंबाला केवळ ४ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते आणि तेही केवळ ४४७ उपचार पद्धतींसाठी. याउलट पंजाबमधील मुख्यमंत्री सेहत योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १० लाखांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळतात.

Goa AAP Mediclaim Demand
Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

शिवाय या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, त्यामुळे सर्वच उत्पन्न घटकांना लाभ मिळतो. सुमारे २ हजार ३५० हून अधिक उपचार पॅकेजेसचा या योजनेत समावेश आहे. यामध्ये मोठ्या शस्त्रक्रिया, कर्करोग, हृदयरोग, डायालिसिस, अवयव प्रत्यारोपण,औषधे तसेच रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरचा खर्च यांचा समावेश आहे. नाईक म्हणाले, इच्छाशक्ती असेल तर सार्वत्रिक आरोग्य योजना राबवता येऊ शकते. पण तशी इच्छाशक्ती भाजपकडे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com