गोव्यातील काजूला हवा राजाश्रय; फेणीमुळे दुप्पट नफा

cashew
cashew
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘मी जपानी लोकांना काजू (cashew) खायला शिकविलं,’ असं गोव्यातील प्रसिद्ध काजू व्यापारी प्रवीण झांट्ये यांचे वडील हरीश उर्फ अण्णा झांट्ये अभिमानाने सांगायचे. यातून गोव्यातील काजूचे महत्त्व अधोरेखीत होते. गेल्या दोन वर्षांपासून गोव्यातील (goa ) काजूचे उत्पादन घटले आहे. त्यावर कडी म्हणजे परप्रांतीय-परदेशी काजू गोव्याच्या काजुशी स्पर्धा करू लागला आहे. ही धोक्याची घंटा आहे.  गोव्याच्या काजूची खासियत काय? राज्यात शक्यतो झाडावर वाळलेला काजू बोंडासह जमिनीवर पडल्याशिवाय वेचला जात नाही. साहजिकच तो चविष्ठ असतो. सत्तरीसारख्या तालुक्यात काजूचे उत्पादन महाकाय आहे. बहुतेक शेतकरी काजूवर अवलंबून आहेत. याबाबत बोलतांना कृषी अभ्यासक सचिन तेंडुलकर म्हणतात, गोव्यातला काजू इतर काजूच्या तुलनेत वेगळा आहे. पण, त्याला राज्याश्रय मिळालेला नाही ही शोकांतिका आहे. गोव्याचा काजू भासवून इतर भागातील काजू हमखास खपविला जातो आणि तो खपतो देखील त्याचा परिणाम स्थानिक काजूवर होतो.  (Cashews in Goa need sanctuary; Double the profit due to Feni)

गोव्यात कर्नाटक, सिंधुदुर्ग तसेच आफ्रिकेतून काजू येतो. त्यात भेसळ करून तो गोव्याचा काजू म्हणून विकला जातो. याबाबत बोलतांना नावेली- साखळी येथील काजू व्यापारी अशोक घाडी म्हणतात, गोव्यातील काजू उत्पादन घटत चालले आहे. त्यामुळे काजू शक्यतो बाहेरच्या प्रदेशातून आयात करावी लागते. काजुचे वेगळे प्रकार आहेत. त्यात180,110,360  असे ते प्रकार आहेत. पण, दर वेगळा असा  नसतो. सध्या दर 120  रुपये दर आहे. सरकार दर निश्चित करीत नाही.बागायतदार महामंडळ दर ठरवितो, खरतर तो कृषी पणन महामंडळाने दर ठरवायला हवा. 

काजूसाठी सध्या न्यायिक दर मिळत नाही असा शेतकऱ्यांचा होरा आहे. त्याबाबत बोलतांना श्री. घाडी म्हणतात की, काजूची वाहतूक, प्रक्रिया यावर बराच खर्च होतो. त्यामुळे तो परवडत नाही. पण, गोव्याच्या काजूला नामांकन मिळाले पाहिजे, तिला राज्याश्रय मिळाला पाहिजे याबाबत त्यांचे दुमत नाही. तसेच मत यंदाचे कृषीरत्न पुरस्कार विजेते सिद्धेश प्रभूदेसाई यांनीही व्यक्त केले आहे. गोव्याच्या काजुला वेगळा दर्जा आहे, तो आधोरेखीत झाला पाहिजे, असे ते नमूद करतात. तेच म्हणणे कृषी अभ्यासक उदय प्रभूदेसाई हेदेखील व्यक्त करतात. 

एकंदर, सर्वानाच गोव्याच्या काजूतील भेसळ थांबून या काजूला वेगळा दर्जा मिळाला पाहिजे, असे वाटते. तसेच शेतकऱ्यांना आपल्या काजुला चांगला दर मिळाला पाहिजे असे वाटते. गोव्याच्या आवश्यकता पाहिली तर केवळ 35  टक्के काजूचे उत्पादन होते, असे अशोक घाडी म्हणतात. 65  टक्के काजू बाहेरून आणावा लागतो. तो पर्यटक खरेदी करतात.आता तर काजुचे उत्पादन 25  टक्क्यांनी घटले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.तर सिध्देश प्रभूदेसाई म्हणतात हे उत्पादन 20  टक्क्यांनी घटले आहे.  एकंदर, गोमंतकीयांची आवडती काजू फेनीदेखील संकटात आली 
आहे, 

फेणीमुळे दुप्पट नफा
वेंगुर्ला-रत्नागिरी येथील काजू उत्पादक त्यांची काजू दर्जेदार असल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हद्दीवरच्या प्रदेशात काजू बी व्यतिरिक्त इतर उत्पादनांना काडीची किमत नाही. त्याउलट गोव्याकडे काजू फेणीचे पेटंट आहे. काजू बोंडांपासून (काजू ॲपल) फेणी किंवा काजूची दारू (उर्राक) तयार होते. त्यातून काजू व्यवसायाशी संबंधीत मजुरांचा खर्च निघतो. त्यामुळे हे पिक फायदेशीर असल्याचे सिध्देश प्रभूदेसाई म्हणतात. गोव्यातल्या काजुला ट्रेडमार्क नाही. पण, या काजूची वेगळी खासियत आहे. त्यामुळे त्याची चव संपूर्ण जगाला वेड लावते. त्यामुळे फलोत्पादन खात्याने या काजुला नामांकन देऊन न्याय द्यायला हवा. अलिकडे उत्पादन घटत असल्याने शेतकरी यापासून दूर जात आहेत, हे थांबविण्यासाठी सरकारने प्रयत्नशील असायला हवे. 
- सिद्धेश प्रभुदेसाई,  कृषीरत्न पुरस्कार विजेते शेतकरी
दर काय आहेत? 
काजूचे दर गोव्यात वेगवेगळे आहेत. सिध्देश प्रभूदेसाई म्हणतात त्याप्रमाणे बागायतदार सोसायटी 118  रुपयांनी किलो काजू खरेदी करीत आहे. व्यापारी नी काजू खरेदी करतात. अशोक घाडी यांच्या म्हणण्यानुसार 120  रुपये किलो असा सध्याचा दर आहे. इतर ठिकाणी काजुला अधिक दर मिळावा यासाठी आंदोलने सुरू आहेत. गोव्यात मात्र तसे कांहीच होतांना दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BJP plans to increase women representation in Goa Assembly
Bank fraud of 75 lakh rupees in Goa
Goa Bicholim marigold flower cultivation
Farmers demand rejection of mining NOC in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com