Cashew Seeds: काजू बियांचा दर 163 रुपयांवर स्थिरावला! आणखी वाढ नाही; हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Cashew Rate: एकीकडे बागायतीत केळी, नारळ, अननस, सुपारी पिकानंतर आता खेती या रानटी प्राण्याने काजू हंगामात काजू बियांना लक्ष केले आहे.
Cashew Seeds
Goa Cashew NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : यावर्षी काजू बियांना सुरुवातीच्या काळात १६१ रुपये प्रतिकिलो असा दर होता. तो दर वाढून १७० पर्यंत जाईल अशी अपेक्षा बाळगून बागायतदार वर्ग होता. सुरुवातीला मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात १ रुपयाने दर वाढून तो १६२ असा झाला होता.

त्यानंतर एप्रिल महिन्यात आणखीन एक रुपयाने वाढ होऊन १६३ असा दर देण्यात आला. तो दर आजही त्यावरच स्थिरावलेला आहे. त्यामुळे यावर्षी केवळ दोन रुपयांनीच दरात वाढ झालेली आहे.

आता काजू हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे व काही दिवसांनी संपणार आहे. सध्या दमट हवामान, वातावरणात होत असलेले बदल, अवकाळी पावसामुळे काजू बिया काळपट होण्याची भीती आहे. सत्तरी तालुक्यात काही गावात चांगले उत्पन्न मिळाले आहे, तर काही ठिकाणी काजू उत्पन्न घटल्याचे चित्र आहे.

Cashew Seeds
Goa Cashew Production: गोव्यात काजू उत्पादनात घट, 'फेणी-हुर्राक' उद्योग संकटात; शेतकरी, व्यावसायिकांना मोठा फटका

दरवर्षी रामनवमी किंवा पुढे येणारा हनुमान जन्मोत्सव या काळात काजू पिकांना प्रचंड बहर येऊन भार आलेला असतो; पण या वर्षी सत्तरीत बऱ्याच ठिकाणी तसे चित्र दिसले नाही. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात काजू पीक आहे.

Cashew Seeds
Goa Agriculture: 15 वर्षांमागे गोव्यात फिरताना सगळीकडे हिरवीगार शेती दिसायची! आता काय दिसते?

खेतींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान

एकीकडे बागायतीत केळी, नारळ, अननस, सुपारी पिकानंतर आता खेती या रानटी प्राण्याने काजू हंगामात काजू बियांना लक्ष केले आहे. याआधीच काजू बियांचे उत्पन्न घटत चाललेले असताना खेती वन्यप्राण्यांकडून फळे फस्त केली जात आहेत. त्यामुळे बागायतदारांसमोर मोठे संकट उभे झाले आहे. खेतींकडून काजू बियांची नासाडी केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com