Nira: गोव्याच्या ‘जंगल ज्यूस’ला मागणी! मये भागात रस्त्याच्या बाजूने महिलांकडून विक्री; काजू पिकावर परिणाम झाल्याने ‘नीरा’चे प्रमाणही कमी

Cashew fruit nira juice: निऱ्याच्या विक्रीतून कमाईही होत आहे. असंतुलित हवामानामुळे यंदा काजू पिकावर परिणाम झाल्याने ‘नीरा’चे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे.
Cashew fruit nira juice
Cashew fruit nira juiceDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ‘जंगल ज्यूस’ अशी ओळख असलेल्या आणि काजू बोंडूंच्या रसापासून मिळणाऱ्या शुद्ध ‘नीरा’ला मागणी असल्याचे आढळून येत आहे. मये भागात तर गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या बाजूने ‘नीरा’ विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

विशेषतः स्थानिक महिला ‘नीरा’ची विक्री करताना आढळून येत आहेत. निऱ्याच्या विक्रीतून कमाईही होत आहे. असंतुलित हवामानामुळे यंदा काजू पिकावर परिणाम झाल्याने ‘नीरा’चे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे.

डिचोलीतील बहुतेक ग्रामीण भागात काजू बोंडूंच्या रसापासून हुर्राक, फेणी ही दारू उत्पादित करण्यात येते. ‘नीरा’ हा दारूचा प्रकार नसला, तरी ज्याप्रमाणे पहिल्या धारेच्या ‘हुर्राक’ला मागणी असते. त्याचप्रमाणे दारू गाळणीच्या प्रक्रियेपूर्वी काजू बोंडूंच्या रसापासून मिळणाऱ्या ‘नीरा’ला मागणी असते.

Cashew fruit nira juice
निरा, हुर्राक, फेणी! 16 व्या शतकात, पोर्तुगीज काळात गोव्यात रोवलेल्या काजूच्या पहिल्या रोपाची झाडावेगळी अद्वितीय रूपे

काजू बोंडू मळून झाल्यानंतर बोंडूंचा चोथा एकत्रित करून झाल्यानंतर त्यावर मोठा दगड किंवा यंत्रात घालून मळलेला चोथा चेपण्यात येतो. त्यानंतर रसाची निघणारी शेवटची धार असते त्यालाच ‘नीरा’ म्हणतात. मये भागात अजूनही काही काजू व्यावसायिक काजू बोंडूंची पायाने मळणी करतात. त्यामुळे येथे नीरा सहज उपलब्ध होत आहे.

Cashew fruit nira juice
Mangroves Goa: हुपळी 'खारफुटी'चे झाड म्हणजे एकेकाळी लोकदैवताचे नैसर्गिक मंदिर ठरले होते..

१०० रुपये लिटरने विक्री

मयेत ‘नीरा’ सहज उपलब्ध होत असल्याने गावातील महिलांसह बहुतेकजण ‘नीरा’च्या विक्री व्यवसायात आहेत. सायंकाळच्यावेळी तर मये तलावाजवळून नार्वेच्या दिशेने गेलेल्या रस्त्याच्या बाजूने महिला मिळून स्थानिक ‘नीरा’ची विक्री करताना आढळून येतात. १०० रुपये लिटर याप्रमाणे ‘नीरा’ची विक्री करण्यात येत आहेत. या रस्त्याने ये-जा करणारे वाहने थांबवून ‘नीरा’ विकत घेताना आढळून येतात. काहीजण खास ‘नीरा’ विकत घेण्यासाठीच त्याठिकाणी येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com